Next
पुणे स्टेशन येथे खासदार शिरोळेंच्या हस्ते ध्वजारोहण
प्रेस रिलीज
Monday, January 28, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this story



पुणे : केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे देशभरातील ७५अ वर्गातील रेल्वे स्थानकांवर १०० फूट ध्वजस्तंभ उभारत ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत ७०व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पुणे रेल्वे विभागातर्फे १०० फूट ध्वस्तंभ उभारण्यात आला. खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अप्पर विभाग व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ विभाग सुरक्षा आयुक्त डी. विकास, वरिष्ठ विभाग वाणिज्य व्यवस्थापक कृष्णत पाटील उपस्थित होते.



या वेळी बोलाताना शिरोळे म्हणाले, ‘आज आपल्या देशाचा विकास झपाट्याने होत आहे; मात्र असे होत असताना केवळ स्वराज्य नाही, तर सुराज्यासाठी आपण कटिबद्ध असायला हवे. याबरोबरच देशाला भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ आणि दहशतवादी घटनांपासून मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.’

केंद्रीय रेल्वे विभागाच्या आदेशानंतर केवळ एका महिन्याच्या आत या १०० फूट ध्वजस्तंभाचे कामकाज पुणे रेल्वे विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आल्याची माहिती देऊस्कर यांनी दिली. या स्तंभावर फडकणारा ध्वज पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासी आणि नागरिकाला प्रेरणा देत राहील, असेही ते या वेळी म्हणाले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link