Next
प्रीमिअम युज्ड कार्स विक्रीसाठी ‘महिंद्रा’चा ‘एडिशन’ब्रँड
प्रेस रिलीज
Tuesday, September 25, 2018 | 10:37 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स या भारतातील आघाडीच्या मल्टि-ब्रँड सर्टिफाइड युज्ड कार कंपनीने पहिले प्रीमिअम युज्ड कार्स फ्रेंचाइजी नेटवर्क असलेला ‘एडिशन’ ब्रँड नुकताच दाखल केला.

पहिले ‘एडिशन’ स्टोअर मुंबईतील जुहू येथे सुरू करण्यात आले आहे आणि त्यामध्ये मर्सिडिज बेंझ, बीएमडब्लू, ऑडी व जॅग्वार अशा प्रीमिअम कार ब्रँडचा समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना उत्तम डील मिळावे म्हणून वाहनांना सर्वंकष वॉरंटी दिली जाणार आहे.

‘एडिशन’ दाखल केल्याबद्दल, महिंद्रा समूहाचे समूह अध्यक्ष (एचआर व कॉर्पोरेट सर्व्हिसेस) व मुख्य कार्यकारी अधिकारी (आफ्टर मार्केट सेक्टर), समूह कार्यकारी मंडळाचे सदस्य राजीव दुबे म्हणाले, ‘वाढते विनियोग्य उत्पन्न असलेले इच्छुक ग्राहक प्रीमिअम कार ब्रँड घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना ‘एडिशन’च्या निमित्ताने त्यांचा आवडता कार ब्रँड अतिशय किफायतशीर किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे.’

महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष पांडे म्हणाले, ‘एडिशन दाखल करणे हा महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्सचा आणखी एक प्रवर्तक निर्णय आहे. यामुळे आमच्या उत्पादनांमध्ये वाढ करून भविष्यातील वाटचालीला चालना देण्यासाठी मदत होणार आहे; तसेच, पूर्णतः नवा ग्राहकवर्ग आमच्यासाठी उपलब्ध होणार आहे.’

महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स ही सध्या भारतातील पहिल्या क्रमांकाची मल्टि-ब्रँड सर्टिफाइड युज्ड कार कंपनी असून, तिची ५०० हून अधिक शहरांत बाराशेहून अधिक आउटलेट आहेत. याद्वारे सर्टिफाइड युज्ड कारबरोबर वॉरंटी दिली जाते. यामुळे युज्ड कार्सची खरेदी व विक्री ही संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत होते. वाहनांची गुणवत्ता सर्वोच्च असावी म्हणून कंपनी ११८ मुद्द्यांच्या आधारे गुणवत्तेची तपासणी करते व आवश्यक बदल करते.

कंपनीने व्यवहारांतील उलाढाल व तंत्रज्ञाना-आधारित उद्योगांमध्ये लक्षणीय वाढ साध्य करून, आर्थिक वर्ष २०१८मध्ये भारतीय युज्ड कार उद्योगातील आपले आघाडीचे स्थान अधिक सक्षम केले. यामध्ये लिलाव (eDiig.com), इन्स्पेक्शन्स (Autoinspekt.com) व प्रायसिंग सोल्यूशन्स (IndianBlueBook.com) यांचा समावेश आहे. या तंत्रज्ञान-आधारित सुविधांमुळे आधी असंघिटत स्वरूप असलेल्या या उद्योगामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यांना चालना मिळत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search