Next
दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलत
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे ‘अँड १०० %’ योजना
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this article:


पुणे : दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के मजुरी माफ असल्यास दागिने खरेदीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची ‘अँड १००%’ योजना सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व दालनांमध्ये ही योजना उपलब्ध आहे. 

या योजनेबाबत कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) अदित्य मोडक म्हणाले, ‘उदा. एखाद्याने योजनेत दहा समान मासिक हप्त्यांत दरमहा तीन हजार रुपये गुंतविल्यास मुदतपूर्तीस तीस हजार रुपये जमा असतील. मुदतपूर्तीनंतर तेवढ्याच रकमेचा दागिना घेतल्यावर दागिन्याच्या मजुरीवर शंभर टक्के सूट मिळेल व ग्राहकास केवळ लागू असणारा कर जमा रकमेव्यतिरिक्त भरावा लागेल. जमा रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेच्या दागिन्याच्या खरेदीवर मजुरीमध्ये पाच टक्के सूट दिली जाईल. दागिने खरेदीसाठी भिशी वा रिकरिंग लावण्याऐवजी ही योजना अधिक आकर्षक आहे. या योजनेत एकदम रक्कम भरण्याचा पर्याय आहे.’  

‘आतापर्यंत अशी योजना या पूर्वी सुरू झालेली नाही आणि योजनेचे वैशिष्ट्य जमा रकमेपर्यंतच्या किमतीच्या दागिन्याची घडणावळ माफ, हेच आहे. योजनेमुळे पुढील सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद नक्कीच वाढणार आहे’,असे कंपनीचे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search