Next
नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या शिबिरांत २६,५४० जणांचे रक्तदान
BOI
Thursday, October 11, 2018 | 11:46 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने नऊ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यभरात व बाहेरच्या राज्यांत घेतलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये विक्रमी २६ हजार ५४० जणांनी रक्तदान केले. महाराष्ट्र शासनाच्या विनंतीवरून आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या औचित्याने ही शिबिरे घेण्यात आली होती. 

विभागवार शिबिराची केंद्रे व तेथील रक्तदात्यांची संख्या अशी - 
१) मुंबई विभाग - ४९ केंद्रे व ५५२६ रक्तदाते. २) मराठवाडा विभाग - ६९ केंद्रे व ५२७८ रक्तदाते. ३) पश्चिम महाराष्ट्र - ४८ केंद्रे व ४०६६ रक्तदाते. ४) उत्तर महाराष्ट्र - ३३ केंद्रे व २३६७ रक्तदाते. ५) कोकण विभाग - ४५ केंद्रे व ४१७६ रक्तदाते. ६) पूर्व विदर्भ - ३३ केंद्रे व ३५६३ रक्तदाते. ७) पश्चिम विदर्भ - १६ केंद्रे व ७०७ रक्तदाते. अशा तऱ्हेने एकूण २९३ केंद्रांवर २५ हजार ६८३ जणांनी रक्तदान केले. 

याशिवाय अन्य राज्यांतही शिबिरे झाली. तिथे ८५७ जणांनी रक्तदान केले. अशा तऱ्हेने एकूण २६ हजार ५४० जणांनी रक्तदान केले आहे. सुरुवातीच्या नियोजनानुसार ३५० केंद्रांवर शिबिरे होणार होती. त्यात वाढ होऊन एकूण ३९३ केंद्रांवर ही शिबिरे घेण्यात आली. याशिवाय गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांतही शिबिरे घेण्यात आली. काही ठिकाणी केंद्राच्या कक्षेतील रक्तपेढ्यांच्या रक्तसाठवण क्षमतेपेक्षा रक्तदात्यांची संख्या जादा झाली. त्यामुळे उरलेले निराश झाले. त्यांना पुढच्या वेळी प्राधान्याने संधी दिली जाईल अशी समजून घालून परत पाठवण्यात आले. 

नरेंद्राचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व केंद्रांवर स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, संप्रदायाचे लोक, रक्त स्वीकारणारे रक्तपेढीचे डॉक्टर्स यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे विक्रमी प्रतिसाद मिळाला.

संस्थान नेहमीच समाजसेवेच्या कार्यात आघाडीवर असते. शेतकरी, बेरोजगार, गरिबांसाठी नेहमी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात. बेरोजगारांना रोजगाराची साधने दिली जातात. गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला जातो. राज्यभरात मोठ्या प्रमाणात असे उपक्रम या संस्थानाद्वारे राबवले जातात. हे ओळखूनच शासनाने संस्थानाला रक्तसंकलनाची विनंती केली होती. संस्थानाने ती यशस्वी करून दाखवली. याबाबत विविध घटकांमधून संस्थानच्या कार्याचा गौरव होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link