Next
‘पलटन’मध्ये दिसणार ३०० खरेखुरे सैनिक
BOI
Saturday, August 18, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this article:

दिग्दर्शक जे. पी. दत्ता सैनिकांसोबत

बॉलिवूडमध्ये आजवर प्रदर्शित झालेले ‘सरहद’, ‘रेफ्युजी’, ‘बॉर्डर’, ‘एलओसी कारगिल’ यांसारख्या दमदार देशभक्तीपर चित्रपटांमुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक जे. पी. दत्ता आपला आगामी ‘पलटन’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटातील एका युद्धाच्या दृश्याचे शुटिंग करण्यासाठी दत्ता यांनी देशसेवेत रुजू असणाऱ्या ३०० खऱ्याखुऱ्या सैनिकांची निवड केली होती. 

दिग्दर्शक जे. पी. दत्ताप्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाची आपली एक विशेष शैली असते. त्याच धाटणीचे, त्याच विषयांचे चित्रपट अशी त्याची ओळख असते. दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या या ‘पलटन’ चित्रपटात जॅकी श्रॉफ, अर्जून रामपाल, गुरमीत चौधरी, सोनू सूद, सिद्धार्थ कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या सात सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

भारत आणि चीन यांच्या सैन्यादरम्यान १९६७मध्ये झालेल्या ‘नथू ला’ संघर्ष यावर आधारित हा चित्रपट आहे. लडाखमध्ये दोन महिन्यांपर्यंत चाललेल्या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एका युद्धाच्या दृश्यासाठी ३०० खऱ्याखुऱ्य़ा सैनिकांनी अभिनयात सहभाग नोंदवला. या दृश्यासाठी खऱ्याखुऱ्या सैनिकांना घेण्यासंदर्भात दत्ता यांना विचारले असता, ‘युद्धकाळात सैन्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यांना काय काय सहन करावे लागते यांवर चित्रित होणारे खरेखुरे दृश्य मला हवे होते. त्यासाठी खऱ्या सैनिकांशिवाय या दृश्याला कोणीच न्याय देऊ शकणार नाही असे वाटले’, असे त्यांनी सांगितले. याशिवाय या सर्व कामांत देशाच्या संरक्षण मंत्रालयाने मोलाची साथ दिल्याचेही दत्ता यांनी म्हटले आहे.     
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search