Next
‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम
BOI
Wednesday, October 31, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आठ नोव्हेंबर २०१८पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आठ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दीपोत्सव व ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेल्या मोजक्या गीतांच्या मैफलीने या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.  

ही मैफल सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर, गायिका आदिती करंबेळकर, तबला वादक गिरीधर कुलकर्णी आणि संवादिनी वादक हर्षल काटदरे रंगवणार आहेत. त्यानंतर पुणे येथील आशय सांस्कृतिक संस्थेच्या सौजन्याने सुधीर मोघे यांनी दिग्दर्शित केलेला ‘या सम हा’ हा लघुपट रसिकांना दाखवण्यात येणार आहे.

आर्ट सर्कलने ‘पुलं’च्या जन्मशताब्दी कार्यक्रमांचे नियोजन जूनपासून केले आहे. वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहे. ‘पुलं’ ‘रत्नागिरीचे जावईबापू असल्याने ‘पुलं’ व सुनीताबाई या दोघांचे आपण देणे लागतो या भावनेतून जन्मशताब्दी वर्ष दिमाखात साजरे होणार आहे. आशय सांस्कृतिक संस्थेच्या सहयोगाने येथे गेली दहा वर्षे ‘पुलोत्सव’ साजरा होतो. त्या व्यतिरिक्त ‘पुलं’च्या विविध पैलूंना स्पर्श करणारे उपक्रम आर्ट सर्कल आयोजित करणार आहे.

‘पुलं’ आणि सुनीताबाईंनी आपल्या वागणुकीतून नात्यांचे नि नैतिक मूल्यांचे आदर्श घालून दिले. दीपोत्सवामध्ये रत्नागिरीकर, रसिक, साहित्यप्रेमींनी भाग घेऊन एक पणती लावून या दांपत्याला सलाम करावा, अशी भावना आहे. पुलोत्सवामध्ये सामाजिक कृतज्ञता सन्मान दिला जातो. यासाठी रसिकांनीही ओवाळणी देण्याचे आवाहन आर्ट सर्कलतर्फे करण्यात आले आहे. ओवाळणीत मिळालेल्या रकमेचे वाटप गेल्या दहा वर्षांतल्या सामाजिक कृतज्ञता सन्मान दिलेल्या संस्थांमध्ये समान केले जाणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
आठ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सात वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.

(पु. ल. देशपांडे यांच्यासंदर्भातील विविध साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link