पुणे : ‘बीएमडब्ल्यू’ या जगप्रसिद्ध मोटार उत्पादक समुहातील ‘मिनी’ या ब्रँडचे पुण्यात स्वतंत्र वितरण दालन सुरू झाले आहे. मिनी इंडियाने बव्हेरिया मोटर्सला आपले अधिकृत वितरक घोषित केले आहे. नुकतेच सुयोग प्लॅटिनम टॉवर्स येथे बव्हेरिया मोटर्सच्या या नव्या दालनाचे अनावरण झाले. या वेळी बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पवाह, बव्हेरिया मोटर्सचे विशाल अगरवाल उपस्थित होते.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पवाह म्हणाले, ‘मिनी’ ही फक्त एका कारहून काही अधिक आहे. ही एक डिझाईन आयकॉन आहे ज्यात इंडिव्हिज्युअल स्टाईल, प्रीमियम क्वालिटी आणि गो-कार्ट फीलिंगचा अनोखा मेळ साधण्यात आला आहे. एक लाईफस्टाइल ब्रँड म्हणून जगभरातील ग्राहकांसाठी प्रेरणा ठरलेला हा ब्रँड आहे. या वितरणकेंद्राद्वारे भारतात उपलब्ध मिनी मॉडेल्सची संपूर्ण शृंखला सादर करण्यात येईल.’
बव्हेरिया मोटर्सचे विशाल अगरवाल म्हणाले, ‘बव्हेरिया मोटर्स प्रदीर्घ कालावधीपासून बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियासह जोडलेला आहे. आमचे नवीन मिनी कार दालन भारतात ‘मिनी’ च्या यशोगाथेमध्ये नक्कीच प्रमुख भूमिका साकारेल.’