Next
ठाण्यात परिसंवाद व प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनचा पुढाकार
BOI
Tuesday, May 28, 2019 | 12:22 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : ‘सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडतर्फे परिसंवाद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी २७ मे २०१९ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

३१ मे ते दोन जून या कालावधीत शिवाजी मैदान, तलावपाळी, जांभळी नाका येथे प्रदर्शन आणि एक जून रोजी गडकरी रंगायतन सकाळी १० ते १.३० या वेळेत परिसंवाद होईल. प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी लागणाऱ्या सर्व विषयांची माहिती मिळण्यासाठी विविध विषयांच्या तांत्रिक बाबींमपग माहिती दिली जाणार आहे. यात घनकचऱ्याचे नियोजन, पार्किंग, बायोगॅस, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर, ई-वेस्ट मॅनेजमेंट, इमारत दुरुस्तीविषयक माहिती, हाउस किपिंग, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, सोसायटी सॉफ्टवेअर, स्वयंपुनर्विकास, ऑडिटर्स, फायर अँड सेफ्टी, वॉटर प्रुफिंग, वॉटर स्टोरेज टँक, सोलर व्यवस्था आदी विषयांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.

गृहनिर्माण संस्थांसाठी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज व येणाऱ्या अडचणी, त्याचप्रमाणे नुकतेच मंजूर झालेले गृहनिर्माण संस्थांविषयीचे नवीन चॅप्टर, स्ट्रक्चरल ऑडिट या विषयांवर अपामे वास्तूविशारद चंद्रशेखर प्रभू, सहकार आयुक्त सतीश सोनी, हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे व संजय कोयंडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

३१ मे रोजी सायंकाळी चार वाजता ठाण्यातील शिवाजी मैदान-तलावपाळी येथे फेडरेशनचे अध्यक्ष राणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या वेळी पुणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

‘महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाउसिंग फेडरेशन ही सहकारी गृहनिर्माण संस्थांची राज्यस्तरीय संघीय संस्था आहे. महाराष्ट्रात जवळपास अडीच लाख सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या जवळपास एक लाख पाच हजारच्या आसपास आहे. या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधित्व राजस्तरावरची संघीय संस्था म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाउसिंग फेडरेशन ही संस्था करते,’ अशी माहिती राणे यांनी दिली.

प्रदर्शनाविषयी : 
कालावधी : ३१ मे ते दोन जून २०१९ 
उद्घाटन : ३१ मे २०१९ 
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : शिवाजी मैदान, तलावपाळी, जांभळी नाका, ठाणे.
परिसंवादाविषयी : 
दिवस : एक जून २०१९ 
वेळ : सकाळी १० ते दुपारी १.३० 
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search