Next
‘इन्शाल्ला’मध्ये सलमान-आलियाची रोमॅन्टिक केमेस्ट्री
१९ वर्षांनंतर भन्साळी आणि सलमान एकत्र काम करणार
BOI
Friday, April 19, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान यांची जोडी म्हटली, तर आठवतो तो ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट. त्यानंतर मात्र हे दोघे एकत्र आले नाहीत. आता तब्बल १९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा ‘इन्शाल्ला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहे. अभिनेत्री आलिया भट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून सलमान-आलियाची रोमॅन्टिक केमेस्ट्री यातून दिसणार आहे.

४० वर्षांचा उद्योगपती आणि २० वर्षांची सिनेअभिनेत्री यांच्यातील प्रेमकहानी अशी या चित्रपटाची कथा असणार आहे. सलमान खान या ४० वर्षांच्या उद्योगपतीच्या भूमिकेत असून आलिया सिनेअभिनेत्री साकारणार आहे. या दोघांच्या वयातील अंतर हे चित्रपटातही ठळकपणे दाखवण्यात येणार आहे. सलमान-आलियाची ऑनस्क्रीन रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहण्यास त्यांचे चाहतेही उत्सुक असतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

या चित्रपटासाठी सुरुवातीला अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांची नावे चर्चेत होती, मात्र आता सलमान खान आणि आलिया यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आलिया सध्या राजामौली यांच्या ‘RRR’ आणि ‘सडक २’ या चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र असून सलमान खान ‘दबंग ३’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. 

येत्या सप्टेंबर महिन्यात ‘इन्शाल्ला’ चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून, पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search