Next
‘इस्रो’च्या उपग्रहांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
पुण्यातील अंतराळविषयक प्रदर्शन १७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार
BOI
Friday, February 15, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this story



पुणे :
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’तर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अंतराळविषयक प्रदर्शनाचे १५ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची माहिती व्हावी, या उद्देशाने सुरेश नाईक एज्युकेशन सेंटर व पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे भरवण्यात आले आहे.

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या उपक्रमाचे सह-प्रायोजक आहे. ‘इस्रो’ने प्रक्षेपित केलेल्या सर्व उपग्रहांची प्रतिरूपे, चांद्रयान व मंगळयान मोहिमेची क्षणचित्रे, विविध रॉकेट्स व सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांची प्रतिरूपेदेखील या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून, विद्यार्थ्यांना ‘इस्रो’च्या संशोधकांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. 

हे प्रदर्शन १५ व १६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले असेल. इतर नागरिकांना या दोन्ही दिवशी संध्याकाळी चार ते सात या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. 

कार्यक्रमाविषयी :

अंतराळविषयक प्रदर्शन 
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच 
कालावधी : १५ ते १७ फेब्रुवारी २०१९

पासेससाठी संपर्क :
श्रीमती अनिता : ९४२२३ ४४६०१
श्रीमती लीना : ८३८०० ७५६३१

(या प्रदर्शनाची झलक आणि ‘इस्रो’चे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link