Next
कथक-कीर्तनाचा झाला संगम...
BOI
Tuesday, March 20, 2018 | 01:03 PM
15 0 0
Share this story

कीर्तन कथक कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे

पुणे :
नृत्यकलेचा उगम कीर्तनकलेच्या माध्यमातून कशा प्रकारे झाला, याचा प्रत्यक्ष अनुभव पुणेकर रसिकांनी नुकताच कीर्तन-कथक कार्यक्रमातून घेतला. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी या दोन्ही कला रंगमंचावर एकत्रितपणे सादर करून रसिकांना अनोख्या कलाविष्काराची विलक्षण अनुभूती दिली.
 
पारंपरिक कलाविष्कार क्षेत्रातील दोन दिग्गजांचा प्रवास रसिकांसमोर उलगडण्याकरिता ‘सूत्रधार’तर्फे ‘कीर्तन-कथक’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी शारंगधर साठे, सुचेता भिडे-चापेकर, गिरिजा बापट, रवींद्र दुर्वे, प्रमोद जोशी आदी मान्यवरांसह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात दुर्गास्तवनाने झाली. या वेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी देवीची महती सांगितली. यानंतर ‘जय दुर्गे...’ या दुर्गा स्तवनावर ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांनी कथक नृत्याच्या सादरीकरणातून देवीला वंदन केले. यानंतर, महिषासुराचा नाश करण्यासाठी देवीने महिषासुरमर्दिनीचा अवतार कसा धारण केला, याचं निरूपण आफळेबुवांनी कीर्तनामधून केले आणि त्या आशयावर आधारित नृत्यसादरीकरणाच्या माध्यमातून रसिकांनी प्रत्यक्ष दुर्गा अवतरल्याचा अनुभव घेतला. 

कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आणि पं. मनीषा साठे यांनी कथकच्या माध्यमातून संत कान्होपात्रा यांची कथा रसिकांसमोर मांडली. आफळेबुवांनी कीर्तनातून मांडलेला भावगर्भ आशय पं. साठे यांनी त्याला समर्पक अशा नेटक्या नृत्यसादरीकरणातून रसिकांसमोर मांडला.

पं. मनीषा साठे यांना चारुदत्त फडके, वल्लरी आपटे, मृण्मयी फाटक, लीलाधर चक्रदेव, सुनील अवचट यांनी, तर चारुदत्त आफळे यांना मनोज भांडवलकर, मिलिंद तायवडे ,वज्रांग आफळे, रेशीम खेडकर यांनी साथसंगत केली. 

(या कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link