Next
रत्नागिरीत स्पर्धा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन शिबिर
रत्नागिरी तालुका भंडारी युवा संघातर्फे आयोजन
BOI
Wednesday, October 03 | 04:07 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : तालुका भंडारी युवा संघातर्फे स्पर्धा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सात ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी दोन या वेळेत शहरातील मराठा भवन येथे होणार आहे.

कमी वयात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी, स्पर्धा परीक्षेची पात्रता व अटींबाबत माहिती मिळण्यासाठी, तसेच हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत क्लास व पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे शिबिर घेण्यात येणार आहे.

या वेळी भंडारी युवा ब्रिगेडचे आणि अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष सुधीर भरडकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख भाई मांजरेकर, रत्नागिरी जिल्हा महिला संपर्कप्रमुख प्रतिभा पाटील, विनायक भाटकर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाएट कॉलेज प्राचार्य सुशील शिवलकर, अधिव्याख्याता व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे रमेश कोरे, रत्नागिरी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सुधाकर मुरकुटे, अधिव्याख्याता व स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे राहुल बर्वे आदी मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिराविषयी :
दिवस :
रविवार, सात ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी दोन.
स्थळ : मराठा भवन, माळनाका, रत्नागिरी.
अधिक माहितीसाठी संपर्क : राजीव कीर- ९१५८२ ४४३८३    
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link