Next
सिंधुदुर्गातील मासेमारांना ‘बेसिक लाइफ सपोर्ट’ प्रशिक्षण
रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार
BOI
Friday, July 26, 2019 | 01:47 PM
15 0 0
Share this article:


सिंधुदुर्गनगरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा व सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील निवती गावामध्ये मासेमारांसाठी बेसिक लाइफ सपोर्ट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांनी मासेमारांना समुद्रामध्ये बोटीवर असताना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर प्राथमिक सीपीआर पद्धतीचा वापर करून ‘बेसिक लाइफ सपोर्ट’द्वारे व्यक्तीला कसे वाचवता येऊ शकते याबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे समुद्रामध्ये बुडालेल्या व्यक्तीला, विजेचा झटका लागलेल्या व्यक्तीला ‘बेसिक लाइफ सपोर्ट’द्वारे कसे वाचवता येऊ शकते याचेही प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. या शिवाय सर्पदंश व आपत्कालीन स्थितीत आपण बचाव कार्यात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो याबद्दलही सुलोकर यांनी मार्गदर्शन केले. 


या प्रशिक्षण कार्यक्रमाला मासेमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम गावाधील तरुण मासेमारांसाठी घेण्याची सूचना या वेळी उपस्थित मासेमारांकडून करण्यात आली. या वेळी रिलायन्स फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशनचे मासेमारांसाठी असलेल्या सागरी हवामानाच्या ध्वनी संदेश, हेल्पलाइन सेवेची व फाउंडेशनची माहिती मासेमारांना दिली. 


निवती गावाच्या सरपंच भारती धुरी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. निवती गावाचे मासेमार पांडुरंग वासुदेव सारंग यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्त्ती  व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, तसेच रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र विभाग प्रमुख दीपक केकाण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक   गणपत गावडे यांनी केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search