Next
बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक नको
BOI
Sunday, May 13, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या सध्या गुंतवणुकीला योग्य असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची....
........
शुक्रवारी, ११ मे २०१८ रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३५ हजार ५३५वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० हजार ८०६ अंकांवर बंद झाला. बाजाराचा नूर आश्वस्त करणारा होता. गेल्या आठवड्यात हेग, पूर्वांकरा, देना बँक, युको बँक, आयएफसीआय फॅक्टर्स, नोव्हार्टिस इंडिया, अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, पीएसपी, सारेगामा, क्विकहील अशा अनेक कंपन्यांचे आकडे प्रसिद्ध झाले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी अनार्जित कर्जांसाठी प्रचंड तरतुदी केल्याने खूप तोटा दाखवला आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणुकीचा विचारही मनात आणू नये. 

‘हेग’ची मार्च २०१८ची विक्री १२.०३ कोटी रुपये आहे. तिचा ढोबळ नफा ९.५१ कोटी रुपये व करोत्तर नफा ६.३४ कोटी रुपये आहे. हेग कंपनीचा शेअर जरी आता तीन हजार २०० रुपयांपर्यंत आला असला, तरी तो घेण्यासारखा आहे. तीन हजार अगर त्याखाली भाव आल्यास अगदी जरूर घ्यावा. वर्षभरात तो चार हजार रुपयांपर्यंत जाऊ शकेल. 

येत्या आठवड्यात ग्राफाइट इंडिया कंपनीचे आकडे प्रसिद्ध होतील. सध्या हा शेअर ७४० रुपयांच्या मागे-पुढे आहे. तोही जरूर घ्यावा. पुढील दोन वर्षे हा शेअर सांभाळून ठेवायला हवा. वर्षभरात तो ९५० रुपयांपर्यंत वाढेल. ‘ग्राफाइट इंडिया’चे शेअरगणिक उपार्जन मार्च २०१८साठी ४६ रुपये अपेक्षित आहे. मार्च २०१९ व २०२० वर्षासाठी ते अनुक्रमे ५५ आणि ७० रुपये होईल, असा अंदाज आहे. ग्राफाइट पुरवणाऱ्या हेग आणि ग्राफाइट इंडिया या दोन भारतीय कंपन्या आहेत. गेली पाच वर्षे तोटा झाल्याने जगातील, विशेषतः चीनमधील या क्षेत्रातील कंपन्या बंद होत्या. आता दर टनाला बारा ते चौदा हजार डॉलर्स असा भाव वाढल्याने चीनमधील कंपन्या पुन्हा सुरू होत असल्या, तरी त्याची झळ भारतीय कंपन्यांना दोन वर्षे तरी लागणार नाही. 

हेग, ग्राफाइट इंडिया, दिवाण हाउसिंग, इंडियाबुल्स हाउसिंग, वेदान्त आणि जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) या कंपन्यांतच सध्या गुंतवणूक करावी. गेल्या आठवड्यात, अमेरिकेतील वॉलमार्ट कंपनीने भारतातील फ्लिपकार्ट या कंपनीचे ७० टक्के शेअर्स १६ अब्ज डॉलर्सला विकत घेतले. फ्लिपकार्टद्वारे वॉलमार्ट आता भारतात बस्तान बसवेल. फुटकळ ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या किशोर बियाणी यांची कंपनीही असाच विदेशी संबंध जोडू बघत आहे. डी-मार्ट नावाने दुकाने असलेल्या ‘अॅव्हेन्यू सुपरमार्ट’चे शेअर्सदेखील आता वर जातील. थोडी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांनी फ्युचर रिटेल, अॅव्हेन्यू सुपरमार्ट या कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत. 


- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link