Next
सुमारे एक लाख लोकांनी घेतली शाकाहाराची शपथ
‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये नोंद
BOI
Tuesday, October 09 | 04:03 PM
15 0 0
Share this story


पुणे : एकाचवेळी जवळपास एक लाख लोकांनी शाकाहाराचा संकल्प करण्याच्या या घटनेची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. पुण्यातील शाकाहार, व्यसनमुक्ती आणि जीवदया यासाठी काम करीत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले.

डॉ. कल्याण गंगवाल
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरगाव-शिर्डी जवळील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात बाबा ओम गुरुदेव आत्मामालिक जंगली महाराज यांच्या उपस्थितीत डॉ. कल्याण गंगवाल यांनी तब्बल ९३ हजार ५५० लोकांना शाकाहाराची शपथ दिली. या कार्यक्रमाला जगभरातील २०० पेक्षा अधिक संत उपस्थित होते. इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी शाकाहार करण्याची शपथ घेणे हा एक विक्रम आहे. त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे. 

या वेळी डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ‘शाकाहारासाठी केलेल्या या संकल्पाची नोंद जागतिक स्तरावर झाल्यामुळे आनंद वाटतो. सुखी जीवनासाठी शाकाहार आणि व्यसनमुक्ती अतिशय गरजेची आहे. धार्मिक उत्सवात आपण व्यसनमुक्ती व शाकाहाराचे पालन करतो. विज्ञानानेही शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आहार असल्याचे सिद्ध केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी शाकाहाराला पर्याय नाही. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link