Next
मल्टि-प्लॅटफॉर्म प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम ‘माइंड वॉर्स’
शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘झी एंटरटेनमेंट’चा राष्ट्रस्तरीय उपक्रम
BOI
Wednesday, April 10, 2019 | 04:11 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : आंतरराष्ट्रीय माध्यम कंपनी व मनोरंजनाचे पॉवरहाउस असलेल्या ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने (ZEEL)’ देशभरातील शालेय मुलांसाठी ‘माइंड वॉर्स’ या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची घोषणा केली आहे.  

हा उपक्रम म्हणजे झी ने एक पायाभरणी करणारे पाऊल टाकले आहे, असे म्हणता येईल. अनेक प्लॅटफॉर्म्सच्या इकोसिस्टीमचा वापर केला जाऊन होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. ज्यामुळे सहावी ते दहावी इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला सर्वसमावेशक चालना मिळणार आहे. आपल्या मल्टिमीडिया कौशल्यांतील शक्तीचा फायदा करून घेत डिजिटल आणि टीव्ही या दोन्हीं माध्यमांत अशी व्यवस्था निर्माण करण्याचा कंपनीचा विचार आहे, जिला देशभरातील तळागाळातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळू शकेल. भारतातील २००हून अधिक शहरांतील ४०,००० शाळांमधल्या एक कोटी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचाही कंपनीचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले आहे.

कंपनी देत असलेल्या मजकुराची तंत्रज्ञानाशी सांगड घालून सूक्ष्म स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे. ज्ञानाधारित लहान मुलांचा मनोरंजन करणारा प्लॅटफॉर्म तयार करण्याचे ‘झी५’ (ZEE5)चे ध्येय आहे, जो ‘झी’च्या अत्याधुनिक डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म झी५च्या माध्यमातून वापरला जाऊ शकेल. देशातील १० दशलक्ष विद्यार्थ्यांना या प्रश्नमंजुषेत सहभागी होता येणार आहे. अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या तीन विषयांतील विद्यार्थ्यांयच्या ज्ञानाची अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कसोटी लागणार आहे.

ही ज्ञानाची मालिका शहरस्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा या तीन पातळ्यांवर घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पात्रता मिळवण्यासाठी, झी५ अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत ४०,०००हून अधिक शाळांच्या संघांतून प्रत्येक शाळेतील दोन चॅम्पियन्सी यामध्ये पात्र ठरतील.
भारतातील ३२ राज्यें आणि केंद्रशासित प्रदेशांत होणाऱ्या या स्पर्धेतून ३२ शाळांचे संघ निवडले जातील, त्यांना ‘राज्यातील विजेते’ म्ह्णजेच स्टे ट चॅम्पियन्स  म्हणून गौरवले जाईल. राज्यांतील विजेते माइंड वॉर्स विजेतेपद २०१९ पटकावण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक पातळीवर योग्य पद्धतीने समाधानकारकरीत्या खेळवल्या जाणाऱ्या माइंड वॉर्सच्या माध्यमातून शाळा व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न असेल.

याबाबत सांगताना ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड’च्या देशांतर्गत ब्रॉडकास्ट व्यवसाय विभागाचे सीईओ पुनित मिश्रा म्हणाले, ‘झी ‘एंटरटेनमेंटमध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांना मूक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतो, ज्यातून त्यांना दीर्घकाळ फायदा व्हावा हा उद्देश असतो. विचारपूर्वक तयार केलेल्या माइंड वॉर्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मोठ्यात मोठा ज्ञानाचा डेटाबेस निर्माण करायचा आहे, जो विद्यार्थी वर्षभर वापरू शकतील. ज्ञानाचे खेळात रूपांतर करण्याचा हा आमचा प्रांजळ प्रयत्न आहे. लहान मुलांच्या घडण्याच्या काळात त्यांना ज्ञानाधारित मनोरंजनाचा पर्याय निर्माण करून देण्याचाही आमचा उद्देश आहे.’

या कार्यक्रमाच्या लाँचनंतर दिल्लीतील १००हून अधिक शाळांतील मुलांसाठी एक प्रश्नमंजूषाही झाली, ज्यात अनेक प्रश्नही विचारले. ‘माइंड वॉर्स’साठी अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या तीन विषयांशी संबंधित १०,००० प्रश्नांचा डेटाबेस तयार केला जाणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search