Next
शंकर केशव कानेटकर
BOI
Saturday, October 28 | 04:00 AM
15 0 0
Share this story

रविकिरण मंडळामधले एक प्रमुख कवी आणि नाटककार वसंत कानेटकर यांचे वडील शंकर केशव कानेटकर यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
२८ ऑक्टोबर १८९३ रोजी सातारा जिल्ह्यातल्या फत्यापूरमध्ये जन्मलेले शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश हे रविकिरण मंडळातले एक प्रमुख कवी होते. 

१९२३ साली त्यांनी लिहिलेल्या ‘अभागी कमळ’ या खंडकाव्याने मराठी भाषेतल्या सामाजिक खंडकाव्याची सुरुवात झाली असं मानलं जातं. त्यानंतर त्यांनी ‘कला ‘ आणि ‘आंबराई’ अशी खंडकाव्यं लिहिली. 

लॉर्ड टेनिसनच्या ‘इनॉक आर्डन’चं त्यांनी ‘अनिकेत’ नावानं भाषांतर केलं होतं. त्यांना १९५९ साली राष्ट्रपतींचं पहिलं शिक्षण पारितोषिक मिळालं होतं. 

बालगीत, यशोगिरी, कांचनगंगा, मानसमेघ, सोनेरी चांदणे, निर्झरसंगीत, स्वप्नभूमी असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

चार डिसेंबर १९७३ रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link