Next
अधिक मासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी
BOI
Saturday, May 26 | 03:01 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : चालू अधिक मास, उन्हाळी सुट्ट्या आणि त्यातच आलेल्या धोंडा वारीमुळे सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठी गर्दी झाली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पंढरपूर हाउसफुल्ल झाले आहे.

सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून, त्यातच अधिक महिन्याचा पर्वकाळ आला आहे. चालू अधिक मास व धोंडा वारी यामुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे राज्य परिवाहन महामंडळाच्या एसटी बसेस व रेल्वे गाड्या भाविकांनी पूर्ण भरून येत आहेत. बहुतांश भाविक खासगी वाहने करून येत असल्यामुळे पंढरपुरात आता गाडी लावण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढलेल्या गर्दीमुळे पंढरपुरातील लॉज व मठ फुल्ल झाले आहेत. येथे आलेले भाविक चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परिसर देवतांचेही दर्शन घेत असल्यामुळे ते पंढरपुरात एक-दोन दिवस मुक्कामाला राहात आहेत. त्यामुळे या भाविकांना विविध मठातील भजन व कीर्तन श्रवणाचा लाभ मिळत आहे. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. त्यामुळे अनेक मठांमध्ये भागवताचे पारायण व कथा श्रवण चालू आहे. त्यामुळे पंढरपुरातील गर्दीत वाढ झाली आहे.

एकादशीच्या दिवशी भाविकांनी चंद्रभागेच्या पाण्यात पवित्र स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चंद्रभागेचे स्नान करून भाविकांनी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या वेळी महिला भाविकांनी चंद्रभागेचे पूजन करून दिवे अर्पण केले.

((अधिक महिन्यानिमित्त पंढरपुरात होत असलेल्या भाविकांच्या गर्दीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
वृषाली पाटील , पुणे About 72 Days ago
छान बातमी आहे .
0
0

Select Language
Share Link