Next
फडणवीस यांना उल्लेखनीय नेतृत्वाबद्दल जागतिक पुरस्कार
प्रेस रिलीज
Friday, June 15, 2018 | 04:39 PM
15 0 0
Share this story

उल्लेखनीय नेतृत्व पुरस्कारवॉशिंग्टन डीसी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी १४ जून रोजी वॉशिंग्टन डीसी शहरात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या. जॉर्जटाउन विद्यापीठ आणि सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज यांच्यातर्फे दिला जाणारा विकासकार्यातील उल्लेखनीय नेतृत्वाचा पुरस्कार यंदा देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. फडणवीस यांनी हा पुरस्कार महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केला. हा जागतिक पातळीवरील पुरस्कार दर वर्षी उल्लेखनीय नेत्याला दिला जातो, जो एखाद्या राज्याचा किंवा देशाचा प्रमुख असतो.

जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जेवा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जेवा आणि प्रतिनिधी मंडळाची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी मुंबई महानगर क्षेत्रात मल्टीमोडल वाहतूक हब, तसेच महाराष्ट्रातील १० हजार खेड्यांमध्ये शाश्वत शहरी जीवनमान उपलब्ध करून देण्याच्या अभियानात मदत करण्याविषयी चर्चा केली. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही अभियानांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांना दिले. तसेच, शहरांत सोलर ग्रीड आणि दुष्काळ निवारणासाठी अधिक साह्य करण्याचे आश्वासनही दिले. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने जमीन अधिग्रहणाच्या प्रणालीची प्रशंसाही त्यांनी केली.   

वॉशिंग्टन डीसी येथे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरमद्वारे आयोजित व्यापार चर्चेतही देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना आणि फोरमचे अध्यक्ष वमुख्य कार्यकारी अधिकारीदेखील उपस्थित होते. त्या वेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राची विकासगाथा आणि पायाभूत सुविधाकेंद्री विकास प्रणाली, राज्यात झालेली ४७ टक्के थेट विदेशी गुंतवणूक आदींबाबत माहिती दिली आणि त्याबद्दल चर्चादेखील केली. नवीन फिनटेक धोरण, फिनटेक राजधानी म्हणून मुंबईचा विकास यांबद्दलही ते बोलले आणि गुंतवणूकदारांना या नवीन संधींचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

काँग्रेसमन जॉर्ज होल्डिंग, काँग्रेसमधील भारताच्या प्रतिनिधी तुलसी गेबार्ड आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.काँग्रेसमन जॉर्ज होल्डिंग, काँग्रेसमधील भारताच्या प्रतिनिधी तुलसी गेबार्ड आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. काँग्रेसमधील भारताचे प्रतिनिधी भारत-अमेरिका मैत्री आणि संबंध सुदृढ करण्यासाठी कार्यरत असतात.

फोर्ड मोटर कंपनीसोबतच्या बैठकीत कार्यकारी उपाध्यक्ष मॅकरी केल्वोन यांनी महाराष्ट्रात एकत्रित वाहतूक क्षेत्र गुणवत्ता केंद्रात ५० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचा, तसेच राज्यात एकत्रित वाहतूक प्रकल्पाच्या कार्यक्रमांतर्गत, स्मार्ट मोबिलिटी प्रणाली राबविण्याबाबत संशोधन करण्याचा प्रस्ताव दिला. बस, ट्रेन, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एकत्रित परिवहन सुविधा देण्यासाठी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि फोर्ड मोटर कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला होता.  

ग्लोबल सस्टेनॅबिलिटी अँड इंडस्ट्री इनिशिएटिव्हचे उपाध्यक्ष जॉन्सन कॉन्ट्रोल्स, क्ले नेसलर यांच्यासोबतही फडणवीस यांनी चर्चा केली. या बैठकीत उपाध्यक्षांनी भारतात इंटेलिजंट वाहतूक नियंत्रण प्रणालीत गुंतवणूक करण्याचा मानस बोलून दाखवला. लॉकहीड मार्टिनचे डेव्ह सटन यांचीदेखील फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान सटन यांनी एफ १६च्या उत्पादनाचा अमेरिकेबाहेरील एकमेव कारखाना उभारण्याचा प्रस्ताव दिला. फडणवीस यांनी लॉकहीड यांना नागपूरला येण्याचे आमंत्रण दिले. यूएस-इंडिया स्टेट अँड अर्बन इनिशिएटिव्ह या संस्थेने महाराष्ट्रासोबत दोन करार केल्याचेही घोषित केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link