Next
‘सौंदर्य जपणे ही काळाची गरज’
प्रेस रिलीज
Thursday, December 28 | 02:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘सौंदर्य जपणे ही काळाची गरज असून त्याने आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते,’ असे मत अभिनेत्री मंजिरी फडणीस यांनी मांडले. येथील एबीसी क्लिनिकच्या १७व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, ‘फक्त स्त्रियांनाच नाही, तर पुरुषांना आणि सगळ्यांनाच आपल्या दिसण्याचे महत्त्व वाटत असून, त्यासाठी हवे ते करण्याची त्यांची तयारी असते. सोशल मिडिया आणि फॅशन मासिकात दररोज ग्लॅमरस, नितळ त्वचा, सुरेख केस आणि शीडशिडीत बांधा असलेले मॉडेल्स पाहून प्रत्येकालाच तसे दिसण्याची ओढ पहायला मिळते. दिवसेंदिवस ब्युटी आणि कॉस्मेटिक या क्षेत्रात विलक्षण प्रगती होते आहे आणि ‘एबीसी’सारखे क्लिनिक या गरजांसाठी उपयुक्त ठरते.’

त्वचा, केस, फिटनेस या सर्वबाबतीत एबीसी क्लिनिकने उत्तमोत्तम ब्रँड्स आणले असून याठिकाणी उत्तम सेवा देण्याचा ‘एबीसी’चा विश्वास आहे. अॅडव्हान्स्ड ग्रो-हेयर, माया स्कीन, मायनस कॉस्मेटिक्स आणि डॉडेंटीस्ट हे जगातील सर्वोत्तम, सुरक्षित आणि अफोर्डेबल ब्रँड आहेत.

अॅडव्हान्स्ड ग्रो-हेयर आणि माया स्कीन, मायनस कॉस्मेटिक्स ही केसांच्या आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्याची एक खात्रीशीर टेक्नोलॉजी असून, यात सर्वात नवीन पद्धती, जगभरातील प्रशिक्षित सर्जन्स, उच्च प्रतीची स्वच्छता आणि कस्टमर केअरचा समावेश आहे.

मायनस कॉस्मेटिक्स हा फिटनेससाठीचा विश्वसनीय उपाय आहे. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांच्या ट्रान्सफॉरमेशनसाठीदेखील एबीसी क्लिनिक मदत करते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link