Next
‘पीएआय-आयसीटी अॅकॅडमी’तर्फे मोफत प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 03:10 PM
15 0 0
Share this story

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. पी. ए. इनामदार.

पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या ‘पीएआय-आयसीटी अॅकॅडमी’तर्फे पी. ए. इनामदार कॉम्प्युटर सेंटरशी संलग्न शाळांमधील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना तसेच कॉम्प्युटर शिक्षकांना पाच दिवसांचे मोफत कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्कींग, मोबाईल रिपेअरिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर आझम कँपस येथे विनामूल्य तसेच भोजन आणि निवास व्यवस्थेसह होते.

प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकया प्रशिक्षणात महाराष्ट्र राज्यातील विविध शहरातील आणि कर्नाटकातील कुडची, बिजापूर तसेच उत्तरप्रदेशातील आझमगढ़ आणि गोवा येथील १२५ विद्यार्थी आणि ७८ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. हे संपूर्ण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांवर आधारीत होते.

या प्रशिक्षणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांची इंग्रजी, मराठी आणि उर्दू कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

‘हे विद्यार्थी भविष्यात बिल गेट्ससारखे उद्योजक बनतील आणि भारताला जगात एक स्वयंपूर्ण डिजिटल इंडिया बनविण्यासाठी हातभार लावतील’, असा विश्वास डॉ. इनामदार यांनी या प्रसंगी व्यक्त केला.  

या वेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले. अॅकॅडमीच्या संचालक मुमताज झेड. सय्यद, सहसचिव ऋषी आचार्य, अॅकॅडमीचे सर्व टीम मेंबर, ज्येष्ठ समाजसेवक ताहेर जाफरीया कार्यक्रमास उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deepak Bidkar About 264 Days ago
फोटोंचा उपयोग चांगला केलाय
0
0

Select Language
Share Link