Next
‘दुष्काळी दौऱ्यात सत्कार स्वीकारणार नाही’
शरद पवार आणि अजित पवार यांचा दुष्काळी दौरा सुरू
प्रेस रिलीज
Thursday, June 06, 2019 | 01:26 PM
15 0 0
Share this article:


बारामती/दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाच जून २०१९ रोजी एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरू केला आहे. या वेळी त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी दिल्या.या दौऱ्यादरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी होणाऱ्या सत्काराला त्यांनी नकार दिला आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांनी खैरेपडळ गावापासून दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात केली. या वेळी त्यांनी दुष्काळी गावातील चारा छावण्यांना भेटी दिल्या; तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी बारामतीतील वढणे गावातील चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.


बारामती तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. दरम्यान शरद पवार सात जूनला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, दुष्काळावरील उपाययोजनांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

माळेगाव, सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ याठिकाणी चारा छावण्यांना भेटी, मोटारी, टँकर फेऱ्या वाढवणे, शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या, पावसाच्या आगमनानंतरही पुढचे २-३ महिने चारा छावण्या सुरू ठेवणे, वीज पुरवठ्याचा सुनियोजित वापर, सुप्याच्या तलावातल्या पाण्याचे नियोजन आदी मुद्द्यांवर भर दिल्याचेही अजित पवार यांनी या वेळी  सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 73 Days ago
Digging small lakes in small villages --an activity not difficult to organise , local participation , no matter when the rains occur . All the communities , no place for politics .
0
0

Select Language
Share Link
 
Search