Next
कापडी पिशवीचा ट्रेंड व्हायला हवा
‘अनुलोम’तर्फे कापडी पिशवीबद्दलची जनजागृती फेरी
BOI
Monday, September 10 | 05:58 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
अनुलोम व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था आणि शहर-परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून सोमवारी (१० सप्टेंबर २०१८) रत्नागिरी शहरातून कापडी पिशवीबद्दल जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते लक्ष्मी चौक या मार्गावर काढलेल्या या फेरीत सुमारे एक हजार महाविद्यालयीन तरुण, नागरिकांनी सहभाग घेतला. फेरीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘अनुलोम’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, ‘नागरिकांची प्लास्टिक पिशवी वापरण्याची सवय बदलण्याचा ‘अनुलोम’ने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. ‘प्लास्टिकमुक्ती’मध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अभिनंदनीय असून, हा संदेश त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. दुकानात गेल्यावर प्लास्टिकची पिशवी मागणार नाही, अशी शपथ घ्या.’

जयस्तंभ येथून फेरीला सुरुवात झाली. रामआळी, गोखले नाक्यामार्गे लक्ष्मी चौक येथे आल्यावर फेरीची सांगता झाली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह ‘अनुलोम’चे भाग जनसेवक रवींद्र भोवड, ‘अनुलोम’चे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत उपस्थित होते.नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ‘अनुलोम’चे कौतुक केले. ‘रत्नागिरीचा स्वच्छतेमध्ये देशात चाळिसावा क्रमांक आला. ‘अनुलोम’च्या चळवळीला पालिका सहकार्य करील,’ असे त्यांनी सांगितले. डॉ. मुंढे व श्री. सुकटे यांनीही ‘अनुलोम’चे अभिनंदन केले. अशा उपक्रमात महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांच्याकडून कृती आवश्यक आहे. जास्तीत जास्त तरुणांनी कापडी पिशवी वापरावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच, ‘‘सेल्फी विथ कापडी पिशवी’ सोशल मीडियावर प्रदर्शित करा,’ असे आवाहन या वेळी ‘अनुलोम’तर्फे करण्यात आले.

सहभागी संस्था आणि व्यक्ती
भारत शिक्षण मंडळ वरिष्ठ महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर कॉलेज व नवनिर्माण कॉलेजमधील एनएसएस विभाग, यश नर्सिंग कॉलेज, लायनेस क्लब, स्वराज्य फाउंडेशन, आधार फाउंडेशन, जनजागृती संघ, जाणीव फाउंडेशन, भंडारी समाज, जय हो प्रतिष्ठान, भंडारी युवा प्रतिष्ठान, प्रयत्न प्रतिष्ठान, ‘अनुलोम’चे वस्तीमित्र संजय पाथरे, सचिन दुर्गवली, संजय भोरे, जितेंद्र शिवगण, वैदेही चव्हाण, मुकुंद जोशी, बिपिन शिवलकर.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link