Next
गणेशगुळ्यात शिमगोत्सवाची सांगता
BOI
Tuesday, March 26, 2019 | 12:32 PM
15 0 0
Share this article:

गणेशगुळे-आगरगुळे येथे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाची पालखी खेळवताना ग्रामस्थ मंडळी.

रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील ग्रामदैवत श्री देव आदित्यनाथाच्या शिमगोत्सवाची रंगपंचमीला रूपं उतरल्यानंतर उत्साहात सांगता झाली.

श्री आदित्यनाथ, श्री महालक्ष्मी, तातोबा या देवतांना रूपे लावून आदित्यनाथाची पालखी संपूर्ण गावात दर्शनासाठी फिरवण्यात आली. आगरगुळे येथील अप्पासाहेब पटवर्धन बसस्टॉप येथे पिपाणी, सनई-चौघड्याचा तालावर ग्रामस्थांनी पालखी खेळवली. मुंबईकर चाकरमानी या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित होते.

मानकरी, गुरव मंडळी, गावकर्‍यांच्या एकोप्याने शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. फाल्गुन चतुर्थीला (२४ मार्च) पालखी आगरगुळे आणि भंडारवाडीमध्ये नेण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. रंगपंचमीला रूपं उतरल्यानंतर शिमगोत्सवाची उत्साहात सांगता झाली.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search