Next
दिल्लीत आपत्ती व्यवस्थापनविषयक कार्यशाळा
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 11:52 AM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : आपत्तीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीकोनातून देशभरातील आपत्तीविषयक सर्व माहिती संकलित करण्याबद्दलची दोन दिवसीय कार्यशाळा नवी दिल्लीत घेण्यात आली. तीन मे रोजी या कार्यशाळेचा समारोप झाला असून, राष्ट्रीय स्तरावर आपत्तीविषयक माहिती संकलित करण्याची सुरुवात झाली आहे.

देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची माहिती आणि आकडेवारी मिळवणे, तसेच तपास अत्यंत कठीण काम असून, ही निश्चित माहिती मिळाल्याशिवाय आपत्तीचे धोके टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे अशक्य आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर या माहितीचे संकलन व्हावे, यादृष्टीने ही कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी युनिसेफ, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण धोरण यांच्यासह ही कार्यशाळा आयोजित केली होती.

ही आकडेवारी गोळा करताना येणाऱ्या अडचणी, माहिती आणि आकडेवारीचे संकलन, सत्यता तपासणे, व्यवस्थापन आणि विश्लेषण अशा सर्व विषयांवरून या दोन दिवसांत चर्चा आणि सादरीकरण करण्यात आले. या चर्चेतून देशभरातल्या आकडेवारीची देखरेख आणि अद्ययावतीकरण करण्यासाठी एक विशेष गट स्थापन करण्यात आला आहे. आपत्तींचे धोके टाळण्यासाठी पंतप्रधानांनी आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेत सांगितलेल्या दहा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावली करण्यासाठी ही आकडेवारी उपयुक्त ठरेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link