Next
गोवा चित्रपट महोत्सवात मृणाल कुलकर्णी यांचा गौरव
‘फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्कार’ प्रदान
BOI
Monday, July 01, 2019 | 03:56 PM
15 0 0
Share this article:

मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करताना शेखर सुर्वे

पणजी : गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या बाराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात (जीएमएफएफ) अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना ‘गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम’ पुरस्काराने गौरवण्यात आले. गोदरेज इंडस्ट्रीज लि.च्या एडिबल ऑइल्स विभागाचे एव्हीपी शेखर सुर्वे यांच्या हस्ते मृणाल कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला. मराठी सिनेमामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, तसेच आरोग्य व फिटनेसला चालना देण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या हेतूने गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्काराचा समावेश करण्यात आला.

मृणाल कुलकर्णी या लोकप्रिय अभिनेत्री व दिग्दर्शिका असून, महिलांसाठी करिअरविषयक जागृती करणाऱ्या अभियानासाठी आणि दातार जेनेटिक्सची ब्रँड अम्बेसेडर म्हणून तसेच ‘कॅन कनेक्ट’ या स्वतःच्या उपक्रमाद्वारे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कर्तबगारीची दखल घेऊन गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्या करिअरमध्ये मराठी चित्रपटाचे  स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. माझ्या कामाद्वारे या क्षेत्राची गुणवत्ता वाढवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. केवळ माझ्या कुटुंबासाठी नाही, तर बाकी लोकांसाठीही आरोग्य व फिटनेस यासाठी मी उपक्रम आयोजित करते. मराठी चित्रपट क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात प्रेक्षकांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.’


गोदरेज इंडस्ट्रीज लि.चे शेखर सुर्वे म्हणाले, ‘संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगासाठी मोठे व्यासपीठ असणाऱ्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पाठिंबा देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एक ब्रँड म्हणून, गोदरेज व्हेज ऑइल प्रत्येक कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी दर्जेदार उत्पादने देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे, आम्ही गोदरेज व्हेज ऑइल्स फिट सेलिब्रेटी मॉम पुरस्कार सुरू करून आमचा सहयोग आणखी अर्थपूर्ण केला. या पुरस्काराबद्दल मृणाल कुलकर्णी यांचे अभिनंदन.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search