Next
‘एनवीडिया’ची गेमर कनेक्ट टूर पुण्यात
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 02:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एनवीडिया’ने आपल्या देशभरातील गेमर कनेक्ट टूरला २२ एप्रिल २०१८ रोजी पुण्यातील ११० फूट डीपी रोडवरील सिद्धी बँक्वेट्स येथून सुरुवात केली. कंपनीच्या गेमर कनेक्ट या गेमर एंगेजमेंट कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष असून भारतातील गेमिंग कम्युनिटीसाठी गेमिंगमधील नवीन मार्ग चोखाळण्याचे आणि पीसी गेमिंगमधील अगदी अलीकडील प्रवाह जाणून घेण्याचे हे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात दोन हजार ५०० हून अधिक गेमिंगप्रेमी सहभागी झाले होते.

डेल, एलजी आणि झोटॅक या गेमर कनेक्टच्या सहयोगी कंपन्यांनीही आपली नवीन उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवल्याने या सोहळ्याचे आकर्षण अधिक वाढले. एलजीने हौशी तसेच स्पर्धात्मक गेम्ससाठीच्या गेमिंग मॉनिटर्सच्या श्रेणीचे दर्शन घडवले. फोरके गेमिंग, व्हीआर आणि प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड्स, फायनल फॅण्टसी एक्सव्ही, फोर्टनाइट, कॉल ऑफ ड्युटी, डब्ल्यूडब्ल्यूआयआय, सी ऑफ थीव्ह्ज, ए वे आउट, प्रोजेक्ट कार्स टू आणि रेनबो सिक्स सीज हे ट्रिपल ए गेम्स एलजीच्या कर्व्ह्ड २१:९ अल्ट्रा वाइड, फोर के, २४० हर्ट्झच्या मॉनिटर्सवर बघून गेमिंगप्रेमी रोमांचित झाले.

डेलच्या नवीन जीईफोर्स जीटीएक्स टेन-सिरीजमधील लॅपटॉप्सही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. नोटबुक्समध्ये एनवीडिया जीफोर्स जीटीएक्स १०८०, १०७०, १०६० आणि १०५० हे जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर गेमर्सना कामगिरीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची क्षमता तसेच उत्तम ऊर्जा कार्यक्षमता पुरवतात. यापूर्वीच्या मॅक्सवेल आर्किटेक्चरवर आधारित जीपीयूजशी तुलना करता, नोटबुक्समधील जीटीएक्स टेन-सीरिज तब्बल ७५ टक्के अधिक चांगली कामगिरी करतात.

झोटॅकने त्यांचा नवीन मेक-वन गेमिंग पीसी या सोहळ्यात प्रदर्शनासाठी ठेवला. प्री-बिल्ट प्लग अॅंड प्ले मशिन क्षेत्रातील सर्वोत्तम दर्जाच्या हार्डवेअरने मेक-वनयुक्त असून,  यामुळे गेमिंगचा अत्युत्कृष्ट अनुभव मिळतो. कंपनीने आपले मिनी गेमिंग पीसी उपस्थितांना प्रत्यक्ष दाखवले. हे उपकरण अत्यंत छोट्या स्वरूपात असूनही शक्तिशाली कामगिरीसाठी ओळखले जाते.

‘गेली तीन वर्षे आम्ही २० शहरांतील गेमिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कम्युनिटीजसाठी २००हून अधिक गेमर कनेक्ट्सचे आयोजन केले आहे. यामुळे आम्हाला १५०००हून अधिक गेमिंगप्रेमींशी जोडून घेण्यात मदत मिळाली. गेमर कनेक्टच्या माध्यमातून, आम्हाला देशभरातील गेमर्सपर्यंत पोहोचायचे आणि त्यांना गेमिंगचा सर्वोत्तम अनुभव द्यायचा आहे,’ असे एनवीडियाच्या दक्षिण आशिया विभागाचे ग्राहक मार्केटिंग प्रमुख वामसी कृष्णा म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link