Next
वाडिया रुग्णालयातर्फे स्तनपानाबाबत जनजागृती
प्रेस रिलीज
Tuesday, August 08, 2017 | 04:52 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोमुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) भारतात दर वर्षी १५ दशलक्ष मुदतपूर्व प्रसूती होतात. पूर्व प्रसूती झालेल्या बाळांना हाताळण्यासाठी सर्वच रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध असतीलच, असे नाही. परिणामी, २०१५ साली दहा लाख नवजात बालकांचा मृत्यू झाला. वाडिया प्रसूतिगृहामधील १५० खाटांनी सज्ज असलेल्या नवजात अतिदक्षता विभागात मुदतपूर्व प्रसूती झालेल्या सुमारे ११०० बाळांवर दर वर्षी उपचार करण्यात येतात. 

बाळांची प्रकृती स्थिर होण्यासाठी वैद्यकीय उपचारांप्रमाणेच आईचे दूधही आवश्यक असते. स्तनांतून येणारे दूध प्रथिनांनी युक्त असतेच, त्याचप्रमाणे या दुधाने बाळामध्ये अधिक चांगली प्रतिकारक्षमता निर्माण होते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना दूध पाजणे आईला शक्य नसेल तर दुग्ध बँकेची मदत होते.

स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आईच्या दुधाच्या लाभांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी रुग्णालयातील परिचारिकांनी पोस्टर तयार केले, ज्यावर स्तनपानाचे महत्त्व विषद केले होते. बाळासाठी हे दूध अत्यंत पोषक असल्याने ही कल्पक पोस्टर्स रुग्णालयात ठिकठिकाणी लावण्यात आली होती. ज्या मातांना स्तनपान देण्यात अडथळा येत होता, त्यांना त्याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच सध्या सर्वत्र चर्चित असलेल्या सोनू गाण्याचा आधार वाडीयाच्या नर्सेसव्दारे ‘आई स्तनपानावर भरोसा नाय काय’ गाण्याद्वारे स्तनपानाविषयी जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला.

‘वाडिया रुग्णालयातील दुग्ध बँकेत दर वर्षी ५०० लिटर दूध गोळा केले जाते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या १५ ते २० बाळांना दर दिवशी या दुधाचा लाभ होतो. प्रत्येक नवजात बालकाला आईचे दूध दिले जावे, कारण त्याचे दीर्घकालीन लाभ असतात आणि बाळाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते. ज्या माता आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाहीत, त्यांना या दुग्ध बँकेचा फायदा होतो. ज्या दात्यांनी दूध दिले आहे आणि ज्या बाळांना हे दूध पाजले जाते त्यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भात संमती घेण्यात येते,’ असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या.

वाडिया रुग्णालयातील दुग्ध बँक सेवेमध्ये प्रशिक्षित परिचारिका दूध काढतात, प्रक्रिया करतात, साठवणूक करतात आणि बाळांना ते दूध पाजतात. अतिरिक्त दूध शीतगृहात २-४ अंश सेल्सिअस तापमानात ३ दिवस ठेवण्यात येते. या कालावधीत त्या दुधाची जीवाणूपरीक्षा होते. त्यानंतर ते ६७ अंश सेल्सिअसला पाश्चराईझ करण्यात येते. त्यानंतर ते दूध उणे ८ अंश सेल्सिअस तापमानावर शीतगृहात साठवून ठेवण्यात येते. अशा प्रकारे साठवून ठेवलेले दूध १०० दिवस टिकून राहते. मातांना त्यांचे अतिरिक्त दूध दुग्ध बँकेला दान करण्याबाबत समुपदेशन करण्यात येते.

गायनेकॉलॉजीमध्ये मिनिमल अॅक्सेस शस्त्रक्रियेत सुधारणा आणि बळकटीकरण :
पद्मश्री डॉ. आर. पी. सोनावाला यांनी मिनिमल अॅक्सेस सर्जरी विभागाचे उद्घाटन केले आणि डॉ. मोटाशॉ नर्गिस डी हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  वाडिया रुग्णालयाच्या गायनेकॉलॉजी विभागातर्फे मिनिमल अॅक्सेस सर्जरीवरच्या सुधारणेवर आणि बळकटीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांवर एन्डोस्कोपी करावी लागते. कारण या प्रक्रियेत व्रण राहत नाही आणि हा ट्रेंड होऊ पाहत आहे. गरीब रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठीही ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणून गायनेकॉलॉजीमध्ये मिनिमल अॅक्सेस शस्त्रक्रियेत सुधारणा करणारी नवीन यंत्रे आणि उपकरणे यांची भर घालण्यात येत आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search