Next
पुलावामातील शहीद जवानांना श्रद्धांजली
BOI
Wednesday, February 20, 2019 | 01:01 PM
15 0 0
Share this story


पुणे : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना बाणेर येथील बंटारा भवन येथे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष, नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह हिंजवडी, सुस, नांदे, माण, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी येथील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

या वेळी शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणातून भारतमातेच्या वीर सुपुत्रांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link