Next
‘एसबीआय लाइफ’तर्फे जागृती अभियान
प्रेस रिलीज
Tuesday, March 26, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : एसबीआय लाइफ इन्शुरन्स या भारतातील सर्वांत मोठ्या खासगी विमा कंपनीने ‘थँक्स ए डॉट’ या ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती करणाऱ्या नाविन्यपूर्ण अभियानाची घोषणा केली असून, या अभियानास टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचा वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह या उपक्रमाने पाठिंबा दिला आहे.

गाठ असल्यास ती स्वतः तपासणी करण्याच्या सोप्या तंत्रांद्वारे लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत महिलांना जागृत करून, भारतातील महिलांना सक्षम करण्याचा या कार्यक्रमाचा हेतू आहे. गाठ तयार होत असल्याची सुरुवातीची लक्षणे शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल व वापरण्यास सोपे असे आत्म-प्रशिक्षणाचे मोड्युल एसबीआय लाइफच्या कॉर्पोरेट वेबसाइटवरून मोफत मागवता येऊ शकते.

हा उपक्रम पुढे नेण्यासाठी आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कम्युनिकेशन व ऑनलाइन प्रसिद्धी यांची जबबादारी व अंमलबजावणी एसबीआय लाइफची डिजिटल व सोशल मीडिया पार्टनर असणारी वॅटकन्सल्ट ही डेत्सु एजिस नेटवर्कमधील डिजिटल व सोशल मीडिया एजन्सी सांभाळणार आहे.

वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह-टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या उपाध्यक्ष व ब्रेड कॅन्सरमधून बचावलेल्या देविका भोजवानी म्हणाले, ‘विमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होण्याबाबत जागृती करून, सातत्याने बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत स्थिर वाढ होत असून, दरवर्षी जवळजवळ एक लाख नव्या रुग्णांची नोंद केली जाते. लवकर निदान होणे महत्त्वाचे असते आणि त्यामुळे हा आजार बरा होण्याची शक्यता ८० टक्के रुग्णांच्या बाबतीत वाढते. या विषयाचे महत्त्व समजून घेण्यात भारतातील असंख्य महिला व त्यांचे कुटुंबीय अपयशी ठरतात आणि नियमितपणे तपासणी करत नाहीत. एसबीआय लाइफच्या ‘थँक्स-ए-डॉट’ या साधनामुळे तुम्हाला गाठ कशी असते, ते शिकता येईल व समजून घेता येईल. स्वतःशी ओळख करून घेण्यास सुरुवात करण्याचा हा मार्ग आहे.’

विशेष अल्गोरिदम व थ्रीडी प्रिंटिंग यांचा वापर करून ब्रेस्ट कॅन्सरची गाठ तयार करण्यासाठी खरे ब्रेस्ट कॅन्सर मॅमोग्राम वापरून ‘थँक्स ए डॉट’ सेल्फ-डिटेक्शन साधन तयार केले आहे. ब्रेल लिपीपासून प्रेरित असणाऱ्या भाषेत ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठींचे आकार लर्निंग कार्डवर दिले आहेत. युजर्स विशेष भाषेचा वापर करून (लर्निंग कार्डवर दिलेल्या) कोडी व प्रश्नमंजुषा सोडवतात. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर तपासणी केल्याचे समाधान मिळते व नियमितपणे स्वतः तपासणी करण्याला उत्तेजन दिले जाते. ‘थँक्स ए डॉट’मुळे महिलांची गाठनिर्मितीची सुरुवातीची लक्षणे शोधण्याची टॅक्टाइल (स्पर्श) क्षमता वाढण्यासाठी मदत होते.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड व कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स चीफ रवींद्र शर्मा म्हणाले, ‘गेल्या २६ वर्षांत भारतातील कॅन्सरचे प्रमाण दुप्पटीहून अधिक वाढले आहे. कुटुंबावर कॅन्सरचा लक्षणीय व विदारक भावनिक व आर्थिक परिणाम होतो. आजार होण्याचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण या दोन्ही बाबतीत ब्रेस्ट कॅन्सर भारतीय महिलांमध्ये सर्रास आढळत असला, तरी भारतात त्याविषयी अनेक समज आहेत. इतकेच नाही, स्वतः तपासणी करण्याच्या संकल्पनेची माहिती असणाऱ्या महिलांना गाठ नेमकी कशी असते, याबद्दल ठोस माहिती नसते. ‘थँक्स-ए-डॉट’ हा पथदर्शी उपक्रम आहे. महिलांची टॅक्टाइल क्षमता वाढवतानाच, त्याचबरोबरीने हा उपक्रम स्वतः ब्रेस्ट तपासणी करण्याबाबत चर्चाही करतो. यानिमित्ताने, समाजामध्ये दीर्घ काळापासून असणाऱ्या सामाजिक अडथळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.’

‘एक जबाबदार विमा कंपनी म्हणून, ब्रेस्ट कॅन्सरविषयी व त्याच्या आर्थिक परिणामांविषयी जागृती करून, महिलांना शिक्षित व सबल करणे, या बाबतीत आमची भूमिका महत्त्वाची आहे, असे आम्हाला वाटते. जीवनातील अनिश्चिततांचा सामना करण्यासाठी महिलांना सज्ज करून, ‘थँक्स ए डॉट’ अर्थपूर्ण बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा आहे,’ असे शर्मा यांनी नमूद केले.

‘एसबीआय लाइफ’ने ‘थँक्स ए डॉट’ हा जागृतीपर उपक्रम दाखल करण्यासाठी अनेक डिजिटल सुविधांची मदत घेतली आहे; स्पर्शातील सामर्थ्याचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि या साधनाद्वारे स्वतः ब्रेस्टची तपासणी करण्याचे फायदा दर्शवणारा व्हिडिओ दाखल करून हे अभियान जाहीर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीला एक पाऊल पुढे टाकण्याचे आणि नियमितपणे व आत्मविश्वासाने स्वतः ब्रेस्ट तपासणी करण्याची सवय अंगी बाणण्याचे आवाहन करतो.

वॅटकन्सल्टचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रादीव डिंगरा म्हणाले, ‘ब्रेस्ट कॅन्सरचे लवकर निदान झाल्याने काही रुग्ण त्यातून बचावू शकल्या. अनेक महिलांना याची कल्पना असली, तरी बहुतांश महिलांना गाठ निर्माण झाल्यावर कसे वाटते, याची नेमकी माहिती नाही. त्यामुळे, ब्रेल लिपी व पॉवर ऑफ टच यांतून प्रेरणा घेऊन, तसेच लवकरच्या टप्प्यात स्वतः तपासणीची सवय रुजवण्यासाठी, आम्ही एक नावीन्यपूर्ण उत्पादन तयार केले - "थँक्स ए डॉट". हे एक वापरण्यास सोपे आत्म-प्रशिक्षण शक्य करणारे पझल कार्ड असून त्यामुळे स्त्रियांना निदान करण्यासाठी सक्षम केले जाते, तसेच स्त्रियांना योग्य ती पावले विलंब न करता उचलता येतात.’

या उपक्रमाचा पहिला टप्पा आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू झाला असून, त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरमधून वाचलेल्या व कार्यकर्त्या सुजया वालिया यांच्या जीवनाची खरी कथा सांगणारा व्हिडिओ समाविष्ट आहे. व्हिडिओमध्ये, वालिया यांनी त्यांच्या कॅन्सरशी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे, कुटुंबाची व आर्थिक तयारी असणे किती महत्त्वाचे आहे ते सांगितले आहे आणि महिलांनी पुढे येण्याचे व या विषयावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search