Next
‘रेशीम गाणी’तून ‘बाबूजीं’ना मानवंदना
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 10:41 AM
15 0 0
Share this article:

पुणे : पूना गेस्ट हाउस मंच व नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने लोकप्रिय संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘रेशीम गाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून बाबूजींना मानवंदना देण्यात येणार असून, हा कार्यक्रम येत्या बुधवारी (२५ जुलै) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

बाबूजींनी संगीतबद्ध केलेली गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. मनिषा निश्चल, गफार मोमीन, मुकुल पांडे, मनीष आपटे हे नामवंत गायक यात सादरीकरण करणार आहेत. मुकेश देडिया यांचे संगीत संयोजन, तर विनया देसाई यांचे निवेदन असणार आहे. मिहीर भडकमकर, विशाल गंड्रतवार, रोहित जाधव व सचिन वाघमारे हे वाद्यवृंद साथ करतील.

या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी व ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे हे दोघे बाबूजींसोबतच्या आपल्या आठवणी सांगणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
बुधवार, २५ जुलै २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search