Next
‘पूना कॉलेज’तर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 04:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘वायअ‍ॅंडएम अंजूमन खैरूल इस्लामच्या पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅंड कॉमर्सतर्फे ‘न्यू ट्रेंडस् इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बँकींग, कोऑपरेशन, मॅनेजमेंट, कॉम्पुटर सायन्स, आयटी अ‍ॅंड एन्हार्यनमेंट’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आठ आणि नऊ फेब्रुवारी २०१९ रोजी ही परिषद सेमिनार हॉलमध्ये होणार आहे,’ अशी माहिती पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅंड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली.

परिषदेचे उद्घाटन आठ फेब्रुवारीला झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ देशातून ३००हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये बाहरीन, मोझांबिक, इराक, अफगाणिस्तान, नामिबीया, नायझेरियन, यामेन, युएसए, जर्मनी, श्रीलंका, थायलंड, रवांडा या देशांचा समावेश आहे. वाणिज्य, अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रातील सर्वांत प्रभावी आणि प्रचलित ट्रेंडचा आढावा घेणे, तसेच विविध देशांतील तज्ञ आणि प्रतिनिधींना एकत्र आणणे हा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे.

कॉमर्स अ‍ॅंड रिसर्च सेंटर विभागाचे प्रमुख डॉ. आब्बास लोखंडवाला, नसरीन परवेज खान आणि वाफीया वाहिद हे परिषद संयोजन समितीमध्ये आहेत. या परिषदेमध्ये बँकॉकच्या थाई-नीचि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे  वनिडा वडीचारोइन, श्रीलंका येथील केलॅनिया विद्यापीठाच्या मार्केटिंग मॅनेजमेंट विभागाचे डॉ. रवींद्र डिसानायके, रूवांडा रेनेसान्सचे अध्यक्ष क्लेरन्स फर्नांडीस, श्रीलंका चित्राल बेनिल्डस फर्नांडो, केलॅनिया विद्यापीठाचे प्रा. मॅपा थिलकार्तने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link