Next
‘हवामानबदल साक्षरतेची चळवळ बनावी’
प्रेस रिलीज
Tuesday, May 15, 2018 | 02:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘हवामानबदलाचे परिणाम दिसण्यास सुरूवात आली असून, कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढण्यासारख्या गोष्टींमध्ये बदलाचा वेग काळजी करण्याजोगा आहे. हवामानबदलाविषयी साक्षरता निर्माण करणे ही एक चळवळ बनायला हवी,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) आणि सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) यांच्यातर्फे पुण्यात ‘हवामान साक्षरता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी  ‘पीआयसी’चे विश्वस्त अमिताव मलिक, ‘सीईई’च्या ‘अर्बन प्रोग्रॅम्स’ विभागाच्या प्रकल्प संचालक संस्कृती मेनन यांच्यासह हरित ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी व तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.

पर्यावरणस्नेही नगररचना, वीजवापर, वाहतूक, बांधकाम क्षेत्रातील पर्यावरणस्नेही प्रयोग, कचरा व्यवस्थापन अशा विविध विषयांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांनी सादरीकरण केले.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘हवामान बदलाच्याबाबतीत प्रत्येक वैयक्तिक आणि सांघिक कृती महत्त्वाची ठरते. पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाला पूरक ठरणाऱ्या धोरणांची आपल्याला गरज आहे. विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसमोर भव्य आव्हाने ठेऊन त्यावर उत्तर शोधण्यासाठी त्यांना उद्युक्त करायला हवे. उत्पादन निर्मिती अधिकाधिक पर्यावरणस्नेही कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा. कंपन्यांनी केवळ ‘सीएसआर’च्या कामांसाठी निधी खर्च करणे अपेक्षित नसून कंपन्यांच्या एकूण कामामध्येच पर्यावरणस्नेही दृष्टीकोन येणे आवश्यक आहे. हवामानबदल परतवणे ही वैयक्तिक आणि सामाजिक अशी दोन्ही प्रकारची जबाबदारी आहे.’

लोकसंख्यावाढ, जीवाश्म इंधनांच्या वापरात झालेली भरमसाठ वाढ, वाढते प्रदूषण आणि त्याबरोबरीने हळूहळू समोर आलेला हवामानबदल याकडे प्रो. मलिक यांनी लक्ष वेधले. जीवाश्म इंधनांशी संबंधित कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून हरित ऊर्जेतील गुंतवणूक वाढवण्यासारखे काही उपायही त्यांनी नमूद केले. सध्या आपली उर्जेची गरज अधिकाधिक प्रमाणात कोळसा, तेल आणि कार्बन इंधनांवर अवलंबून असून, त्यात बदल गरजेचा असल्याचे मत त्यांनी मांडले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link