Next
देशात प्रथम ‘ओरिएंट’च्या एलईडी बल्बला फाईव्हस्टार रेटिंग
प्रेस रिलीज
Saturday, August 18, 2018 | 12:30 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : सी. के. बिर्ला समुहाचा भाग असलेल्या ‘ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड’ ने आपल्या नऊ वॅट एलईडी बल्बसाठी बीईईकडून (ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी) फ़ाईव्हस्टार रेटिंग प्राप्त केले असून, असे रेटिंग मिळवणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

पुनीत धवन
याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख पुनीत धवन म्हणाले, ‘आम्हाला बीईई फ़ाईव्हस्टार प्रमाणित एलईडी बल्ब्सचा सन्मान मिळाल्याने अभिमान वाटत आहे. आम्ही नेहमीच एलईडी बल्बसाठी बीईईच्या स्टार लेबलिंगचे प्रबळ समर्थक राहिलो आहोत. यामधून ग्राहकांना लाइट आऊटपुट व व ऊर्जा बचतीसंदर्भात खात्री मिळते.’

ते पुढे म्हणाले, ‘आमचा एलईडी लायटिंग व्यवसाय फक्त दोन वर्षांतच आठ पटीने वाढला आहे. आम्ही आज नॉन-ओईएम विभागामध्ये देशातील सर्वात मोठी एलईडी बल्ब उत्पादक कंपनी आणि अनेक सरकारी संस्थांसाठी पसंतीची पुरवठादार कंपनी बनलो आहोत. गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही नवीन उत्पादन विकास, दर्जामध्ये वाढ व स्वयंचलन, स्वदेशी घटक आणि उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला असून, त्याकरता मोठी गुंतवणूक केली आहे.’ 

‘बीईई एलईडी बल्ब्सना फाइव्ह-स्टार प्रमाणन देण्यासाठी ल्युमिनस कार्यक्षमता (प्रति वॅट ल्युमन्स) आणि फोटो-बायोलॉजिकल सुरक्षा यांसारख्या इतर सुरक्षा आवश्यकतांकडे लक्ष देते. ओरिएंटचा नऊ वॅट फ़ाईव्हस्टार प्रमाणित एलईडी बल्ब बीआयएस सुरक्षा मानकांची पूर्तता करतो. २५ हजार तासांपर्यंत टिकून राहण्यासोबतच प्रतिवॅट १२० ल्युमन्स वितरित करतो’, असेही त्यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search