Next
डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये ‘मूट कोर्ट’चे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this story



औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे आणि यूजीसीच्या सौजन्याने चालविल्या जाणाऱ्या ‘ह्युमन राइट सर्टिफिकेट कोर्स’अंतर्गत ‘मूट कोर्ट’ हा उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोर्टाचे कामकाज कसे चालते. त्याचप्रमाणे कोर्टात वादी आणि प्रतिवादी यांच्या बाजू कशा पद्धतीने मांडल्या जातात याची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला होता.’



या अभ्यासक्रमासाठी अॅड. रोहित सुर्वसे, रोहित लेले, अॅड. मनीषा बिट्रो यांनी न्यायाधीशाची भूमिका पार पडली. या प्रसंगी अॅड. मयुरा बोर्डे, अॅड. हर्षवर्धन लोणकर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोर्टाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख  महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास सदाफळ यांनी करून दिली. ‘आयक्यूएसी’ चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी आभार मानले. या वेळी प्रा. सुप्रिया पवार, डॉ. संजय नगरकर, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. मयुर माळी, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Adv Surawase Harishchandra About 12 Days ago
Very nice and useful programme. Keep it up
0
0

Select Language
Share Link