Next
अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ‘फकिरा’चे अभिवाचन
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 01:02 PM
15 0 0
Share this storyऔंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार विजेत्या ‘फकिरा’ कादंबरीचे अभिवाचन केले.

कला शाखेच्या तृतीय वर्षात (मराठी विभाग) शिकणाऱ्या नेहा काकडे, मोनाली मालवणकर, प्रणाली शिंदे, चंद्रकांत सोनवणे, सुदेश भालेराव आदी विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले.

‘फकिरा’ कादंबरीचे अभिवाचन करताना विद्यार्थिनीया प्रसंगी बोलताना डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य माणसाला जगण्याची प्रेरणा देणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारे आहे. ‘फकिरा’ आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करतो. त्याप्रमाणे आपणसुद्धा आपले आयुष्य समाजासाठी समर्पित करायला पाहिजे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगण्याची प्रेरणा देणारे आणि मानवतेचा संदेश देणारे आहे. दोन दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या, १५ लघुकथा, १२ गाणी आणि एक प्रवासवर्णन आदी साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन साहित्य लेखन करावे.’

कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय नगरकर आणि प्रा. डॉ. अतुल चौरे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
PROF. RAMCHANDRA RAUT About 204 Days ago
VERY NICE. STUTYA UPAKRAM.
0
0
Nandini About 204 Days ago
Nice👌👍😊
1
0
Chandrakant Sonawane About 204 Days ago
अतिशय सुंदर लेख संपादित करण्यासाठी मनापासून आभार मानतो.. ⛳ सर खूप आनंद झाला आहे 😘
1
0
Atul Choure About 204 Days ago
अप्रतिम बातमी.....☝👌👌👌👌 सुंदर
1
0

Select Language
Share Link