Next
‘संविधानप्रेमी कर्मयोगी संत हरपला’
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 04:10 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘देशभर संविधान जागृती आणि संविधानाचा प्रसार करणारे; मानवतावादी भय्यूजी महाराज यांच्या निधनामुळे संविधानप्रेमी कर्मयोगी संत हरपला आहे,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत भय्यूजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे.

आज (ता. १३) इंदौर येथे दिवंगत भय्यूजी महाराज यांच्या अंत्यविधिस उपस्थित राहून आठवले यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

‘भय्यूजी महाराज हे प्रबोधनकार राष्ट्रसंत म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी आत्महत्या केली ही बातमी कळल्यावर विश्वास  बसत नव्हता. त्यांच्याशी माझे अनेक वर्षांपासून जवळचे संबंध होते. त्यांच्या अचानक निघून जाणे अनेकांच्या जीवाला चटका लावणारे ठरले आहे. ते मूळचे महाराष्ट्रातील अकोल्यातील होते. मध्यप्रदेशात इंदौरमध्ये त्यांचा आश्रम आहे. भारत भीम यात्रेच्या महू येथील समारोप सभेस भय्यूजी महाराज उपस्थित राहिले होते. त्यांनी देशभर संविधान गौरवाचा प्रसार केला होता. भूमजन्मभूमी महू येथे संविधान मंदिर उभारावे ही त्यांची इच्छा होती.’

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील भारत उभा राहिला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी शोषित-पीडित वंचित समाजाच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना मदतीसाठी सदैव ते कार्यरत होते. सामाजिक क्षेत्रात भय्यूजी महाराजांनी मोठे योगदान दिले होते. अध्यात्मिक क्षेत्रात प्रबोधनकार म्हणून भय्यूजी महाराजांचे वेगळेपण बहुजन समाजाला आकर्षित करणारे होते. त्यांच्या निधनाने परिवर्तनशील चळवळीची मोठी हानी झाली आहे,’ असे आठवलेंनी शोकसंदेशात म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link