Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’च्या ‘एनएसएस’चे भुकुम येथे श्रमसंस्कार शिबिर
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 12:02 PM
15 0 0
Share this story



पुणे : वारजे येथील आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट् कँपस व नऱ्हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स यांच्या विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) मुळशी तालुक्यातील भुकुम गाव येथे चार ते दहा जानेवारी २०१९ या कालावधीत निवासी श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

भुकुमचे सरपंच उमेश आंग्रे, उपसरपंच सीमा ननवरे, ग्रामसेवक अनिल बोराटे, भुकुम येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भारती खोपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत श्रमसंस्कार सत्रे, विविध विषयांतील तज्ज्ञांची व्ह्याख्याने जनजागृती फेरी, ग्राम स्वच्छता, योग सराव, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने व संगणक प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या व या वास्तूंच्या संवर्धनाबाबत जनजागृती केली. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध सामाजिक विषयांना अनुसरून प्रबोधनात्मक कार्यक्रम केले. शिबिर कालावधीत आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कँपसचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. दीक्षित, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल लवटे, डॉ. शरद मुळीक, भूगावचे उपसरपंच दीपक करंजावने, पत्रकार नीलेश ऐंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर घुगे आणि सचिन वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरातील विविध उपक्रम राबविण्यात आले.



 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link