Next
‘डीकेटीई’मध्ये २७ नोव्हेंबरला पासपोर्ट मेळावा
प्रेस रिलीज
Monday, November 26 | 02:16 PM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये २७ नोव्हेंबर २०१८ रोजी पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत डीकेटीईमध्ये पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात केवळ १०० रुपयांत पासपोर्ट अर्ज भरून घेतला जाणार असून, पासपोर्टशुल्क अतिरिक्त असेल.

नागरिकांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, एज्युकेशनल डॉक्युमेंट आदी मूळप्रत आणि झेरॉक्स कागदपत्रांसह सकाळी नऊ वाजता डीकेटीईच्या दरबारहॉल येथे रजिस्ट्रेशन काउंटरवर नोंदणी करणे गरजेचे आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link