Next
‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे आयोजन
BOI
Saturday, February 02, 2019 | 12:34 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’, ‘भारत अस्मिता फाउंडेशन’ आणि ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ यांच्या वतीने ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०१९’चा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (तीन फेब्रुवारी) दुपारी अडीच वाजता एमआयटीतील स्वामी विवेकानंद सभामंडपात हा कार्यक्रम होईल. 

विख्यात शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

केरळच्या ‘कोझीकोडे’ येथील ‘आयआयएम’चे संचालक प्रा. डॉ. देबाशिश चटर्जी, खाजदार सुप्रिया सुळे, गायक, अभिनेते स्वानंद किरकिरे, ‘डब्ल्यूएचओ’चे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे हे यंदाच्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारा’चे मानकरी आहेत. तसेच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे जनक डॉ. एफ. सी. कोहली यांना ‘भारत अस्मिता विशेष जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. शाल, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link