Next
‘एसबीआय जनरल’ला ३९६ कोटी रुपयांचा नफा
प्रेस रिलीज
Wednesday, May 09, 2018 | 11:36 AM
15 0 0
Share this story

मुंबई : एसबीआय जनरल इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीने आर्थिक वर्ष १७-१८ मध्ये ३९६ कोटी रुपये करोत्तर नफा (पीएटी)  नोंदवला आहे. आर्थिक वर्ष १६-१७मध्ये तो १५३ कोटी रुपये होता. यामध्ये १३१ कोटी रुपयांच्या असामान्य उत्पन्नाचा समावेश आहे. हे उत्पन्न वगळल्यास, कार्यात्मक बाबींतील पीएटी आणि अंडररायटिंग नफा २६५ कोटी आणि (११८ कोटी) आहे. 

याबाबत बोलताना  एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पन महापात्र म्हणाले, ‘विमा कंपनीचे खरे यश हे अंडररायटिंग नफ्यात आहे आणि या क्षेत्रातील सर्वांत नवीन कंपनी असूनही, आम्ही त्या दिशेने जात आहोत. आम्ही तोट्याचे प्रमाण कमी केले असून, कार्यात्मक खर्चही कमी करण्याकडे आणखी एक पाऊल टाकले आहे.  या क्षेत्राच्या सरासरी वाढीच्या दराहून अधिक वाढीचा दर राखण्यातही आम्हाला यश आले आहे. आमच्या शाखा व मध्यस्थांमार्फत बाजारपेठेतील विस्तार वाढवण्याचाही प्रयत्न आम्ही करत आहोत. अंडररायटिंग नफ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हाच प्राथमिक मार्ग आहे.’ 

‘सध्याचे वितरण जाळे, जोखमीचा स्वीकार, दाव्यांची हाताळणी आणि खर्चाची कार्यक्षमता यामुळे आर्थिक वर्ष १७-१८मध्ये आमच्या नफ्याची कमान चढती राहिली. लोकसंख्येच्या सर्व स्तर व विभागांना लागू पडतील अशी उत्पादने विकसित करत असून, ग्राहकांच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही आम्ही करत आहोत.’ असेही ते म्हणाले.

‘आर्थिक वर्ष १७-१८मध्ये कार्यात्मक खर्च कमी होऊन १८ टक्क्यांवर आला, आर्थिक वर्ष १६-१७मध्ये तो २१ टक्के होता.  आर्थिक वर्ष १६-१७मध्ये ७५ टक्क्यांवर असलेले तोट्याचे प्रमाण, १७-१८ आर्थिक वर्षात ७१ टक्क्यांवर आले.चालू काळासाठीचे संयुक्त गुणोत्तर सुधारून ९८ टक्क्यांवर आले आहे (१०६ टक्क्यांचे असामान्य उत्पन्न वगळता). गेल्या आर्थिक वर्षात हे गुणोत्तर ११३ टक्के होते. व्यवस्थापनाखालील मालमत्ता अर्थात एयूएमचे मूल्य आर्थिक वर्ष १७-१८मध्ये पाच हजार २९२ रुपयांवर पोहोचले, गेल्या आर्थिक वर्षात ते चार हजार ३६२ कोटी रुपये होते. समभागांवरील परतावा अर्थात आरओई गेल्या आर्थिक वर्षात १३.९ टक्के होता, तो आर्थिक वर्ष १७-१८मध्ये जवळजवळ दुप्पट म्हणजेच २६.५ टक्के झाला. व्यवसायाच्या अनेक विभागांमध्ये वाहन विम्याचा वाटा सर्वांत अधिक म्हणजे २८ टक्के राहिला, त्याखालोखाल अग्निविमा आणि पीकविम्याचा वाटा अनुक्रमे २३ टक्के आणि २० टक्के राहिला. आरोग्यविमा आणि व्यक्तिगत अपघात विमा या दोहोंचा वाटा आर्थिक वर्ष १७-१८मध्ये प्रत्येकी १४ टक्के राहिला’, असेही महापात्र यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link