
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०१८मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी नगर परिषदेची शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयाच्या तब्बल आठ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. नगर परिषदेच्या शाळाही गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये पुढे असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दामले विद्यालयातून यंदा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २५ विद्यार्थी बसले. त्यापैकी २१ विद्यार्थी पात्र झाले. त्यापैकी आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या विद्यार्थ्यांना श्रद्धा गांगण व योगेश कदम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व जिल्हा गुणानुक्रम :
मधुरा संतोष पावसकर (११), कार्तिक वरेकर (१८), जय कांबळे (२३), आर्यन पानकर (३३), गायत्री जोशी (३४) चिन्मय सागवेकर (४५), समृद्धी घवाळी (५९) सिद्धी जाधव (७५) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाचे आतापर्यंत १९०हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यंदा शाळेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारी शाळांच्या पटसंख्येबाबत सर्वत्र चिंतेचे वातावरण असतानाही गेली पाच वर्षे दामले विद्यालयाचा पट सातत्याने वाढून ५००हून अधिक झाला आहे.
सकाळ-संध्याकाळी मोफत जादा तासिका घेऊन मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची प्रचंड मेहनत, विद्यार्थ्यांची धडपड आणि पालकांचे अनमोल सहकार्य, हेच यशाचे गमक असल्याचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी सांगितले.

‘गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०१७मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन सुरू केले. यामुळे विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळाला. ऑक्टोबरपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला. नगरपालिकेच्या शाळांतही दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे,’ अशी प्रतिक्रिया शिक्षक योगेश कदम यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष राहुल पंडित, शिक्षण समिती सभापती स्मितल पावसकर, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रद्धा हळदणकर, नगरसेवक प्रदीप साळवी, राजन शेट्ये, माजी नगराध्यक्षा राजेश्वीरी शेट्ये, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेवक प्रशांत साळुंखे, माजी शिक्षण मंडळ सभापती मंजिरी साळवी, प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक कांबळे, उपाध्यक्षा सावंतदेसाई, तसेच पालक शिक्षक संघ, माता पालक संघ सदस्य यांनी विद्यार्थी, तसेच शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
(राज्याच्या निकालाची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. रत्नागिरीतीलच पटवर्धन हायस्कूलच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. फाटक हायस्कूलच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)