Next
श्रमदानातून दुष्काळमुक्तीकडे...
BOI
Tuesday, May 23, 2017 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

सातारा : ‘पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्रकार्याला, समाजकार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.

साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच केली. त्या वेळी ते बोलत होते. ‘पवारवाडी ग्रामस्थांनी अतिशय चांगले काम केले आहे. दुष्काळावर मात करायची असेल, तर त्यावर श्रमदानाचा उपाय आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. पावसाचा थेंब न् थेंब आपल्या गावाच्या, आपल्या मालकीचा आहे. तो गावातच थांबला पाहिजे आणि मुरला पाहिजे. ‘माथा ते पायथा’ विविध उपचार करून आपण पाणी अडवतो, त्याबरोबरच मातीही अडवली पाहिजे. या कामामुळे माती थांबते. त्यातून पाणी भूगर्भात जाते आणि गाव जलयुक्त होते. पवारवाडी गाव वॉटर कप स्पर्धेसाठी दावेदार आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

या वेळी इंधनाबाबतचा एक लाख ९३ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंच राजेंद्र पवार यांना दिला. वन विभागाच्या वतीने या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या झाडांची पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘वन विभागाचे काम एक्सलंट आहे’ असे गौरवोद्गार काढले आणि उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांचे अभिनंदन केले.

जलयुक्त शिवार अभियानात पवारवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेली कामे :
डीप सीसीटी : १७ हजार मीटर, दगडी बांध : दोन हजार २०० मीटर, लहान माती बांध : सहा, सीसीटी एक हजार २६७ मीटर, अनघड दगडी बांध : १३५, विहीर पुनर्भरण : १५, ठिबक सिंचन : १२६ हेक्टर, गाळ काढणे : १५ हजार घन मीटर, ओढा रुंदीकरण : १५ हजार ४०० घनमीटर, मोठे माती बांध : पाच, जाळी बंधारे : दोन, टायर बंधारा : एक, शोषखड्डे : १९०, लावलेली झाडे : ९०३ (सीसीटी म्हणजे सलग समतल चर)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search