Next
‘एन-करेज सोशल एंटरप्राइज फाउंडेशन’ची स्थापना
टाटा केमिकल्सचा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, November 21, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा केमिकल्स लिमिटेड या रासायनिक आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ‘एन-करेज सोशल एंटरप्राइज फाउंडेशन’ची (एन-करेज)घोषणा केली. लोकांच्या जगण्याचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाणी, पोषण, पर्यावरणपूरक ऊर्जा अशा मुलभूत मानवी गरजांच्या माध्यमातून समुदायांचे सक्षमीकरण करून, उपजिविकेचे शाश्वत पर्याय उभारून हा उपक्रम समाजाला सेवा देईल. 

या वेळी टाटा केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आर. मुकुंदन म्हणाले,‘एन-करेज’ ही ना-नफा तत्त्वावरील संस्था असून, टाटा समूहाच्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या तत्त्वज्ञानानुसार; तसेच सर्वसमावेशक शाश्वत विकासाच्या अधिक मोठ्या उद्दिष्टासाठी तिची स्थापना करण्यात आली आहे. टाटा समूहाने राष्ट्रबांधणीच्या कामात १५०  वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून, या संस्थेच्या स्थापनेची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. पहिले पाऊल म्हणून, ‘एन-करेज’  टाटा-स्वच्छ या वॉटर प्युरिफायर ब्रँडच्या माध्यमातून ५० लाख घरांना स्वच्छ पेयजल पुरवणार आहे. स्वयंसेवी संस्था, ग्रामीण स्तरावरील उपक्रम यांच्या मदतीने; तसेच पारंपरिक व्यवहारांतून लक्ष्यगटापर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे.’

‘या उद्दिष्टाच्या दिशेने काम करण्यासाठी सुक्ष्म व छोटे उद्योजक/महिला बचतगट/एफपीओंचा शोध घेण्यासाठी; तसेच त्यांना या कामात सहभागी करून घेण्यासाठी एनकरेज सक्रियरित्या प्रयत्न करणार आहे. सुक्ष्म-छोट्या उद्योगांचा विकास यासाठी काम करणाऱ्या आणि ग्रामीण व शहरी केंद्रांमध्ये उत्पादन-सेवांच्या विक्रीसाठी जाळे असलेल्या अन्य काही सामाजिक संस्था, तसेच उपक्रमांसोबत धोरणात्मक भागीदारीही कंपनी करू शकते’, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search