Next
दी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजतर्फे ‘लँप लायटिंग’चा कार्यक्रम
BOI
Thursday, April 04, 2019 | 04:59 PM
15 0 0
Share this article:

‘लँप लायटिंग’वेळी शपथ घेताना विद्यार्थी.

रत्नागिरी :
रत्नागिरीतील दी यश फाउंडेशनच्या ‘कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या बेसिक बीएसस्सी, जीएनएम व एएनएम या तीन वर्षांतील ९० विद्यार्थ्यांचा लँप लायटिंग कार्यक्रम नुकताच स्वामी समर्थ मंगल कार्यालयात झाला. या वेळी प्राचार्या मीनाक्षी देवांगमठ, रजिस्ट्रार शलाका लाड यांच्यासमवेत सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.

दीपप्रज्ज्वलन करताना शलाका लाड व मीनाक्षी देवांगमठ.

या कार्यक्रमाला दी यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने व सहव्यवस्थापकीय विश्वस्त मिहिर माने यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्या मीनाक्षी देवांगमठ यांनी सांगितले, ‘नर्सिंग क्षेत्रात दूरदृष्टी व ज्ञान, शिस्त हवी. जे आजारी आहेत, वेदना सहन करताहेत त्यांच्या वेदना कमी होण्यासाठी सेवा दिली पाहिजे. लोकांची काळजी घेण्याचे हे व्रत असून, कॉलेजमध्ये याचे कौशल्य शिकवण्यात येते.’सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन केले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडची मेणबत्ती प्रज्ज्वलित करण्यात आली. हे दृश्य पाहण्यासारखे होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली व नर्सिंग क्षेत्राची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून नाईटिंगेल यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला व्यासपीठावर प्राध्यापिका श्रद्धा सागवेकर, चेतन अंबुपे, अपेक्षा आंबवकर, रमेश बंडगर, डॉ. शिवदीप कीर, निनाद सकटे, कीर्ती करंबेळकर, प्राची गुरव, सारिका साळुंखे, अमेय भागवत आदी उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kunkawlekar Arun About 135 Days ago
कार्यक्रम अप्रतिम.... यश फाऊंडेशन,प्राचार्य, रजिस्ट्रार मँडम, कर्मचारी वृंद यांना मनपुर्वक शुभेच्छा....
1
0

Select Language
Share Link
 
Search