Next
सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कार्यालयाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, June 04, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व उसदर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल ॲग्रो फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य संचलित स्व. सौ. धोंडुबाई नामदेवमालक पवार सार्वजनिक मोफत वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कार्यालयाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक मोहन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, निवृत्त न्यायाधीश बी. आर. पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे, जिल्हाध्यक्ष हिरामण बांदल, पुणे शहराध्यक्ष दत्ता वाल्हेर, प्रदेश संघटक आ. मो. खान, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण नाईक, सचिव प्रकाश घोरपडे, शंकरराव मोरबाळे, मानसिंग भोसले, उपाध्यक्ष वासुदेव शिंदे, युवाध्यक्ष रवी पवार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याच्या केशवनगर भागातील ससाणेकॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल ॲग्रो फाउंडेशनचे सचिव रविशंकर पवार यांनी केले होते. या वेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले. त्यांच्या कार्यालयासाठी व संगणक यंत्रणेसाठी विठ्ठल पवार यांच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली. 

या वेळी राठोड यांनी विठ्ठल पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असून, याचे अनुकरण सर्वांनी करण्याचे आवाहन केले. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सोईसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल गौरवाद्गार काढले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search