Next
नववर्षाच्या स्वागताला आमराया नटल्या
BOI
Wednesday, January 02, 2019 | 01:17 PM
15 0 0
Share this story

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सचिन कुलकर्णी यांची मोहोरलेली आमराई.सोलापूर : सध्या सर्वत्र आंब्याची झाडे मोहोराने बहरून गेल्याचे सुखद चित्र दिसत आहे. दर वर्षी या भागात आंब्याची झाडे उशीरा मोहोरतात; मात्र यंदा कडाक्याच्या थंडीमुळे झाडे नववर्षाचा मुहूर्त साधत लवकर मोहोरली आहेत. मोहोराच्या सुगंधाने आसमंत दरवळून निघाला आहे.

दर वर्षी आंब्याला सर्वसाधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोर यायला सुरुवात होते. या वर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच थंडीने जोर धरला आहे. हे वातावरण आंबा पिकासाठी पोषक असल्याने झाडांना मोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे. या भागातील बहुतांश आमराया आता मोहोराने (तऊर) बहरल्या आहेत. हा मोहोर इतक्या प्रमाणात आहे की त्यामुळे आंब्याच्या फांद्या झुकून गेल्या आहेत. मोहोराचा सुगंध सर्वत्र दरवळू लागल्याने आमरायांमध्ये मधमाशांचे गुंजन सुरू झाले आहे. आंब्याची झाडे मोहोरल्याने बागायतदरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जितेंद्र लोणारी , औरंगाबाद About 80 Days ago
खूपच छान आणि अतिशय वेगळी बातमी आहे . अशा प्रकारच्या बातम्या वाचल्यावर मन प्रसन्न होते .
0
0

Select Language
Share Link