Next
सरसम येथे तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धा
BOI
Friday, August 31 | 01:10 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर :
तालुक्यातील  मौजे सरसम येथील कै. श्रीधरराव देशमुख  शाळेत तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धा २८ आणि २९ ऑगस्ट २०१८ रोजी झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संगपवार होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. श्रीधरराव देशमुख शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.



या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये १४ वर्षीय वयोगटातील मुलींच्या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक हुतात्मा जयवंतराव पाटील शाळेने पटकावले. मुलांच्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कै. श्रीधरराव देशमुख शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवले. १७ वर्षीय वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक कै. श्रीधरराव देशमुख शाळेने, द्वितीय पारितोषिक हु. ज. पा. खडकी शाळेने पटकावले. १७ वर्षीय मुलींच्या गटामधून प्रथम पारितोषिक हिमायतनगरमधील हु. ज. पा. शाळेने हिमायतनगर, तर द्वितीय पारितोषिक मनीषा आश्रम शाळेने पटकावले.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख क्रीडा संयोजक म्हणून के. बि. शेनेवाड यांनी काम पाहिले. गोविंद गोडसेलवार, चव्हाण सर प्रमुख पाहुणे होते. पंच म्हणून भावंडे सर, जाधव सर, करंडे सर, चव्हाण सर, मोरलवाड मॅडम, कांबळे सर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार ढेमकेवाड सर यांनी मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link