Next
स्ट्रीमकास्ट उभारणार सावंतवाडीत पहिले डेटा सेंटर
प्रेस रिलीज
Wednesday, July 18, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this story

‘स्ट्रीमकास्ट ग्रुप’ तर्फे सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या डेटा सेंटरचे भूमिपूजन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्ट्रीमकास्ट ग्रुपचे अध्यक्ष निमिष पंड्या, स्ट्रिम क्लाऊडचे प्रवक्ते मार्क अल्ड्रिज उपस्थित होते.

सावंतवाडी : आघाडीची खासगी आयपी क्लाऊड ऑपरेटर कंपनी ‘स्ट्रिमकास्ट ग्रुप’ सावंतवाडी येथे उच्च क्षमतेचे डेटा सेंटर उभारणार आहे. येथील बारा एकर क्षेत्रावर पुढील चार-पाच वर्षात बावीसशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करून, कंपनीचे देशातील हे पहिले डेटा सेंटर अस्तित्वात येणार आहे. 

नुकतेच या केंद्राचे भूमिपूजन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्ट्रीम क्लाऊडचे प्रवक्ते मार्क अल्ड्रिज, स्ट्रीमकास्ट ग्रुपचे अध्यक्ष निमिष पंड्या, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत,  आमदार वैभव नाईक  उपस्थित होते.  

दीपक केसरकर
या वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘सिंधुदुर्ग हे नैसर्गिक सौंदर्याचे ठिकाण आहे. आम्ही त्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असून, जागतिक नकाशावर याबद्दल जनजागृती करण्याचाही प्रयत्न करीत आहोत. सिंधुदुर्गमध्ये गैर-प्रदूषणकारी फ्यूचरिस्टिक उद्योगांचे, आयटी आणि इंजिनियरिंग सारख्या क्षेत्राचे स्वागत करीत आहोत. आज या भविष्याची सुरुवात आहे. संपूर्ण समाजाला लाभ मिळवून देण्याच्या स्ट्रीम क्लाऊडच्या तत्वज्ञानासह, आयटी एक्सलन्सच्या एसएआय सेंटरचे उद्घाटन सिंधुदुर्गच्या तरुणांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात विकासाची संधी देईल.’

स्ट्रिम क्लाऊडचे प्रवक्ते मार्क अल्ड्रिज म्हणाले, ‘एसएआय सेंटर ऑफ आयटी एक्सलन्स तंत्रज्ञानातील तज्ज्ञ तयार करेल. सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील तरुणांना माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्यात हे केंद्र उपयुक्त ठरेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link