Next
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे ‘संगीत रजनी’
पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी आयोजन
BOI
Wednesday, February 13, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this story

अवधूत गुप्तेस्वप्नील बांदोडकरजुईली जोगळेकर


रत्नागिरी : ‘जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित बहारदार ‘संगीत रजनी’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील दोन दिग्गज गायक कलाकार अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांच्या धमाकेदार सादरीकरणाने रंगणार आहे. यात ‘सूर नवा ध्यास नवा’फेम गायिका जुईली जोगळेकर हिच्या सुरांबरोबर, आघाडीची नृत्यांगना सुवर्णा काळे हिचा अप्रतिम नृत्याविष्कारही रसिकांना पहायला मिळणार आहे,’ अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

सुवर्णा काळे
हा कार्यक्रम १५ फेब्रुवारी २०१९ रोजी चिपळूण येथील पवन तलाव येथे ६.३० वाजता, तर रत्नागिरीतील पोलीस परेड ग्राउंड येथे १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, मँगो इव्हेंट्सतर्फे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आपले कर्तव्य अहोरात्र पार पडत असतो. राज्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणारा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. नियम, कायदे यांचे पालन करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन त्या समस्यांचे निवारण करण्याच्या हेतूने, तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या मान्यतेने १९८०साली ‘महाराष्ट्र पोलीस कल्याण निधी’ची स्थापना करण्यात आली. या कल्याण निधीमधून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पुरविणे, आर्थिक मदतीबरोबरच आवश्यक साधन-सुविधा पुरविणे, विविध कल्याणकारी योजना राबविणे आदी उपक्रम राबविण्यात येतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा पोलीस कल्याण निधीमार्फत अनेक कल्याणकारी योजना मांडून अंमलात आणल्या गेल्या आहेत. सेवा, आरोग्य, शिक्षण, निवास, आर्थिक सक्षमता, व्यक्तिमत्व विकास, व्यावसायिक कार्यकौशल्य, अशा विविध उपक्रमांद्वारे पोलिसांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने सातत्याने प्रामाणिक प्रयत्न होत असतात. याच हेतूने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधी उभारण्यासाठी ‘संगीत रजनी’चे आयोजन चिपळूण व रत्नागिरीमध्ये केले आहे.
 
गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांचा चिपळूणमध्ये प्रथमच कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम भव्य-दिव्य स्वरूपात सादर होणार असून, ओम साई डेकोरेटर्सचा भव्य रंगमंच, स्टेज व प्रेक्षकांत भव्य एलईडी स्क्रीन आणि प्रोफेशनल स्टेज लाइट्सनी रंगमंच उजळणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत वादक कलावंत रितेश ओहोळ, अमृता ठाकूरदेसाई, सुमित सरफरे, नितीन डोळे यांच्यासह रत्नागिरीतील वादक व गायक कलावंतही यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील उदयराज सावंत यांची दर्जेदार साउंड सिस्टीम वापरण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध आहेत. पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या या उपक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : पवन तलाव, चिपळूण
दिवस : रविवार, १७ फेब्रुवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : पोलीस परेड ग्राउंड, जेलनाका, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link